विदेशी पर्यटकांना धारावी झोपडपट्टीचे सर्वाधिक आकर्षण


भारत भेटीवर येणाऱ्या पर्यटकांना जगप्रसिद्ध ताजमहाल, अजंठा वेरूळ, कुतुबमिनार या सारख्या लोकप्रिय पर्यटन स्थळांचे अधिक आकर्षण वाटते असा तुमचा समज असेल तर ट्रीप अॅडव्हायझरने नुकत्याच केलेल्या सर्व्हेक्षणात तो चुकीचा ठरला आहे. या कंपनीने आशियातील टॉप टेन ट्रॅव्हलर चॉइस एकस्पिरीयंस २०१९ साठी केलेल्या सर्व्हेक्षणात आशिया यादीत मुंबईतील धारावी स्लम १० व्या क्रमांकावर असून तिने या यादीत ताजमहालाला मागे टाकले आहे.


परदेशी पर्यटकात सर्वाधिक पसंती असलेले भारतातील धारावी स्लम हे एकमेव स्थान ठरले आहे आणि तिने जगातील सात आश्चर्यात सामील असलेल्या ताजमहालचा पत्ता कट केला आहे. या यादीत कंबोडियाच्या सीएम रिप पासून अंगोर वाट टूर व काब्री सनसेट क्रुझवर एओनांग थायलंड मध्ये एन्जोय करणे या प्रवासाचा समावेश आहे. इंडोनेशियातील जंगल स्विंगसह उबुद टूर या यादीत पहिल्या क्रमाकांवर आहे.


भारतात भटकंतीसाठी खूप जागा आहेत. नेचर वॉक, साहसी पर्यटन, किल्ले, महाल, हिल स्टेशन या सारख्या स्थानात झोपडपट्टीला स्थान मिळावे याचे अनेकांना आश्चर्य वाटत असले तरी बहुतेक स्लम टूर ऑपरेटर चॅरिटीसाठी कमाईचा एक हिस्सा त्याच समुदायाला परत करतात. याच भागात राहणाऱ्यांना गाईड म्हणून प्रशिक्षण देतात. येथे शाळा, महिला शिक्षण, छोटे उद्योग सुविधा देतात. त्यामुळे झोपडपट्टीवासीय या टूरना सपोर्ट करतात. असेही समजते कि केवळ भारतातच नाही तर जगातील अन्य देशात स्लम टुरिझमची क्रेझ वाढते असून त्यात रिओ द जनेरो, जोहान्सबर्ग, न्यूयॉर्क, डेट्रोइट, कोपनहेगन अश्या शहरातील झोपडपट्ट्यांना पर्यटक आवर्जून भेटी देत आहेत.

Leave a Comment