अमेरिकेच्या स्वतंत्रता सोहळ्यात टँक, विमाने सहभागावरून विवाद


दरवर्षी ४ जुलै रोजी साजऱ्या होणाऱ्या स्वतंत्रता सोहळ्यात यंदाच्या वर्षी रणगाडे आणि लढाऊ विमाने सहभागी होणार असल्याची घोषणा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्यापासून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका करून विवाद सुरु केला आहे. २०२० ची निवडणूक जिंकण्यासाठी सशत्र बळाचा वापर ट्रम्प करत आहेत असा आरोप विरोधक करत आहेत तर ट्रम्प यांनी अमेरिकेची लष्करी ताकद जगाला दाखविण्यासाठी पँटागॉन कडून मार्शल रणगाडे आणि लढाऊ विमाने मागविल्याचे म्हटले आहे.

अन्य देशांप्रमाणे अमेरिकेच्या स्वतंत्रता सोहळ्यात सैन्य परेड समाविष्ट नसते. हा दिवस परंपरागत पद्धतीने साजरा होतो आणि आजपर्यंतच्या सर्व राष्ट्राध्यक्षांनी तो नेहमीच साधेपणाने साजरा केला आहे. त्यामुळे परेड मध्ये लष्करी सामर्थ्य दाखविण्याचा ट्रम्प यांचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात आला आहे.


१९९१ मध्ये एकदा वॉशिंग्टन मध्ये रणगाडे आणि सैनिक परेड झाली होती. तेव्हा ८ हजार सैनिक इराकने अमेरिकेवर केलेल्या पहिल्या आक्रमणाच्या शेवटाचा आनंद साजरा करण्यासाठी नॅशनल व्हिक्टरी सेलेब्रेशन परेड मध्ये सामील झाले होते. ट्रम्प यांनी मात्र मंगळवारी ४ जुलैच्या डीसी मधील समारंभासाठी अमेरिकेला सलाम करताना, पँटागॉन आणि आमचे महान सैन्य अधिकारी उत्साहित असल्याचे म्हटले आहे. अमेरिकन नागरिकांना जगातील सर्वात मजबूत आणि सर्वात उन्नत सेनेसह अन्य बाबींचे दर्शन घडवीत आहोत असे म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार व्हाईट हाउस आणि पँटागॉन अनेक महिने सैन्य परेडची तयारी करत आहे. ट्रम्प जेव्हा जानेवारी २०१७ मध्ये राष्ट्राध्यक्ष बनले तेव्हाच त्यांनी लगेच स्वतंत्रता दिवस संगीत, आतषबाजी आणि सैन्य परेडसह साजरा केला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

Leave a Comment