टिकटॉक व्हिडीओमुळे सापडला तीन वर्षापुर्वी हरवलेला नवरा


तामिळनाडू: सध्या टिकटॉकशी संबंधीत अनेक घटना समोर येत असतात. अनेक लोकं या अॅपला शिव्या तरी देतात, नाहीतर त्याची प्रशंसा तरी करतात. मात्र सध्या टिकटॉकमुळे तामिळनाडूमध्ये घडलेली एक घटना चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे.

तामिळनाडूतील एका महिलेला तीन वर्षापुर्वी गायब झालेला आपला नवरा टिकटॉक व्हिडीओमुळेमुळे सापडला आहे. तीन वर्षापुर्वी महिलेने नवरा गायब झाल्याची पोलिसात तक्रार दिली होती. तीन वर्षात पोलिस त्या महिलेच्या नवऱ्याचा शोध घेऊ शकले नाहीत. मात्र टिकटॉकच्या एका व्हिडीओमुळे तो सापडला आहे. त्या महिलेच्या एका नातेवाईकाने एका टिकटॉक व्हिडीओमध्ये तिच्या नवऱ्याला पाहिल्यावर तो सापडला.

तामिळनाडूमध्ये राहणाऱ्या जया प्रदा यांचा पती सुरेश हा 2016 मध्ये बायको व मुलांना सोडून निघून गेला होता. अनेक ठिकाणी पहिल्यानंतरही पती न सापडल्यावर महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली होती. मात्र तरीही तो सापडला नाही. मात्र महिलेच्या नातेवाईकाने सुरेशशी मिळत्याजुळत्या माणसाचा व्हिडीओ टिकटॉवर पाहिला. शेवटी महिलेनी ही माहिती पोलिसांना दिल्यावर त्यांनी व्हिडीओमध्ये सुरेश बरोबर दिसणाऱ्या ट्रांसजेंडर महिलेचा शोध घेत सुरेशला पोलिसांनी शोधून काढले.

Leave a Comment