अचानक पुलावरून गायब झाल्या गाड्या-व्हिडीओ व्हायरल

ऑप्टिकल इल्यूज़न, अर्थात दृष्टीभ्रम या सारख्या गोष्टी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. बघणारा विचार करत राहतो की, हे काय होत आहे… सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गाड्या आणि मोटारसायकली रस्ता बदलत नदीकडे वळताना दिसत आहेत आणि अचानक गायब होत आहेत. डॅनियल या ट्विटर युजर्सने हा व्हिडीओ ट्विट केला असून, या व्हिडीओमध्ये एका क्षणात रोडवरील ट्रॅफिक अचानक गायब होताना दिसत आहे.


आतापर्यंत या व्हिडीओला तब्बल 65 हजार लोकांनी बघितले आहे. डॅनियलने हा व्हिडीओ पोस्ट करताना लिहिले की, हो, ट्रॅफिक गायब होत आहे. तुम्ही सुध्दा हा व्हिडीओ एकदा बघाच.

बघणाऱ्या प्रत्येकाला या व्हिडीओने आश्चर्यचकित केले आहे. अनेक युजर्सनी या पुलाला बरमुडा ट्रँगल असल्याचे देखील घोषित केले.

तर हॅरी पॉटर्सच्या चाहत्यांनी हा पुल लंडनमधील रेल्व स्टेशचा तो खांब आहे ज्यात घुसून थेट हॉगवर्टस स्कूलमध्ये शिकणाऱ्या प्लॅटफॉर्म क्रंमाक पावणे 10 वर पोहचता येते, असल्याचे देखील म्हटले.

काही जणांनी तर हा पुल दुसऱ्या जगात जाणारा रस्ता असल्याचे देखील म्हटले.

मात्र काही युजर्सनी या व्हिडीओमागचे सत्य शोधूनच काढले. एका ट्विटर युजर्सने ट्विट केले की, व्हिडीओमध्ये जो पुल दाखवण्यात आलेला आहे. तो पुल नसून, एक साधा रस्ता आहे आणि व्हिडीओमध्ये जी नदी दाखवण्यात आली आहे ती नदी नसून, एका पार्किंगचे छत आहे ज्यात गाड्या जात आहेत.

Leave a Comment