मागील सहा महिन्यात टाटाच्या केवळ एका नॅनो कारची विक्री

मागील सहा महिन्यात टाटा मोटर्सच्या केवळ एका नॅनो कारची विक्री झाली असून, यामुळे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीच्या खराब परिस्थिती बाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. टाटा मोटर्सने या वर्षी जानेवीरपासून एकाही नॅनो कारचे उत्पादन केलेले नाही. तर फेब्रुवारीपासून एकाही नॅनो कारची विक्री झालेली नाही. मात्र असे असले तरी, कंपनीचे म्हणणे आहे की, विक्री कमी झाली म्हणून, नॅनो कारचे उत्पादन बंद करण्याचा कोणताही अधिकृत निणृय अद्याप घेण्यात आलेला नाही.

कंपनीचे प्रवक्ता म्हणाले की, मागणीनुसार आम्ही कारची विक्री करत आहोत. याआधी मागीलवर्षी डिसेंबरमध्ये कंपनीने सानंद प्लँट येथे 85 नॅनो कारचे उत्पादन केले होते. मात्र जानेवारीपासून आतापर्यंत एकही कार बनवण्यात आलेली नाही.

याआधी देखील टाटा मोटर्सने संकेत दिले होते की, 2020 पर्यंत या कारचे उत्पादन बंद करण्यात येणार आहे.

टाटा नॅनो ही कारच्या किमंतीमधील एंट्री लेवल कार असून, रतन टाटा यांची ही कल्पना होती. त्यांनी दुचाकीवर प्रवास करणाऱ्या परिवारासाठी नॅनोच्या रूपात सुरक्षित आणि स्वस्त विकल्प देण्याची कल्पना मांडली होती. मात्र भारतीय ग्राहकांकडून या कारला जास्त मागणी मिळाली नाही. 2009 मध्ये नॅनो कारची केवळ एक लाख रूपयांमध्ये विक्री करण्यात येत होती.

Leave a Comment