सनी लिओनीचं नवीन गाणं ‘क्रेझी हबीबी’ प्रदर्शित


अभिनेत्री सनी लिओनीचं नवीन गाणं नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ‘क्रेझी हबीबी’ नावाच्या या आयटम साँगमध्ये सनी जबदस्त डान्स करताना दिसत आहे. प्रदर्शित होताच गाणे चर्चेचा विषय ठरले आहे.

केवळ 24 तासात या गाण्याला 30 लाखांपेक्षा अधिक लोकांनी बघितले आहे. या गाण्यात सनी लिओनी बरोबरच दिलजीत दोसांझ आणि वरूण शर्मा देखील दिसत आहे. हे गाणे प्रसिध्द गायक गुरू रंधावाने गायले आहे.

कृती सेनन आणि दिलजीत दोसांझ यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘अर्जुन पटियाला’ या चित्रपटातील हे गाणे असून, येत्या 26 जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याआधी देखील सनी लिओनीची ‘बेबी डॉल’ आणि ‘लैला मै लैला’ ही गाणी प्रेक्षकांना आवडली होती.

Leave a Comment