न्यायाधीशांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह; न्यायाधीशानेच लिहिले पंतप्रधान मोदींनी पत्र


अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रंग नाथ पांडे यांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक गंभीर आरोप केले आहेत. याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. पत्रामध्ये उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची नियुक्ती करताना घराणेशाही आणि जातीयवाद हे निकष वापरले जात असल्याचे आरोप केले आहेत.

त्यांनी लिहिले आहे की, न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी कोणतीही नियमावली नाही. या वेळी केवळ घराणेशाही आणि जातीयवाद चालू आहे. भारताचे संविधान हे भारताला एक लोकतांत्रिक राष्ट्र असल्याचे घोषित करते. त्याच्या तीन पैकी एक मुख्य न्यायपालिका सध्या वंशवाद आणि जातीयवादामध्ये वाईट पद्धतीने अडकली आहे. येथे न्यायाधीशाच्या परिवाराचे सदस्य असणे हेच पुढील न्यायाधीश होणे निश्चित करते.

राजकीय कार्यर्त्यांचे मुल्यांकन त्यांच्या कामाच्या आधारावर निवडणुकीमध्ये जनतेद्वारे केले जाते. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निवडीआधी त्यांना परिक्षा द्यावी लागते. दुसऱ्या न्यायालयांच्या न्यायाधीशांना देखील परिक्षेमध्ये योग्यता सिध्द करूनच निवड होण्याची संधी मिळते. मात्र उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवड करताना आपल्याकडे कोणतेच मापदंड नाहीत. फक्त एकच योग्यता आहे ती म्हणजे घराणेशाही आणि जातीयता., असे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रंग नाथ पांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

Leave a Comment