सोशल मिडियावर ट्रेंड करतोय सचिन- सुंदर पिचाई यांचा फोटो


आपापल्या क्षेत्रातील दोन दिग्गज एकाच फोटोत झळकले तर ती बातमी होतेच. मात्र गुगलचे सीईओ गुगलवर ट्रेंड करत असतील तर ते बातमीपेक्षा अधिक काहीतरी नक्कीच आहे. रविवारी वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत झालेला इंग्लंड आणि इंडिया सामना पाहण्यासाठी आलेले मास्टरब्लास्टर सचिन आणि गुगल सीईओ सुन्दर पिचाई यांचा एकत्र फोटो बीसीसीआयनेच ट्विटरवर शेअर केला आणि गुगल युजर्स कडून त्यावर प्रतिक्रिया आणि लाईकसचा जणू पाऊस पडला. हा सामना टीम इंडियाने गमावल्याचे दुःख त्यामुळे थोडे हलके झाले. सचिन, सुंदर पिचाई यांचा फोटो प्रसिद्ध होताच लोकांनी सुंदर पिचाईवर प्रचंड प्रमाणात सर्च केले असेही दिसून आले.

सचिन क्रिकेट मधला मास्टरब्लास्टर तर पिचाई गुगलचे मास्टरमाइंड अशी प्रतिक्रिया उमटणे साहजिक होते. पिचाई क्रिकेट शौकीन आहेत आणि वर्ल्ड कप सुरु होण्यापूर्वी यांनी भारत व अमेरिकन टॉप कार्पोरेट समीट मध्ये बोलताना विश्व कप अंतिम सामना टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्या मध्ये व्हायला हवा मात्र ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडचे काही सांगता येत नाही . या दोन्ही टीम चांगल्या आहेत असे मत व्यक्त केले होते. त्याचवेळी त्यांनी अमेरिकेत प्रथम बेसबॉल खेळताना तो क्रिकेट प्रमाणे खेळल्याची आठवण शेअर केली होती.


पिचाई म्हणाले होते, बालपणापासून मला क्रिकेट खेळणे आवडते आणि त्यावेळी सुनील गावस्कर व नंतर सचिन माझे आदर्श होते. अमेरिकेत बेसबॉल खेळताना क्रिकेट मध्ये जसा चेंडू तडकावून बॅट बरोबर घेऊन धाव घेतो तशीच मी बेसबॉलमध्ये घेतली पण माझे कुणीच कौतुक केले नव्हते. त्यामुळे बेसबॉल माझ्यासाठी अवघड झाला. पिचाई यांचा क्रिकेट खेळतानाचा फोटोही व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे सोशल मिडीयावर ट्रेंड करत असलेल्या सचिन व पिचाई याच्या फोटोवर प्रतिक्रिया येत असल्या तरी या दोघांनी त्याच्या पर्सनल अकौंटवरून हा फोटो शेअर केलेला नाही.

Leave a Comment