बुमराहची प्रशंसा करताना रणवीर सिंह म्हणाला, हिरा आहेस तू हिरा


काल झालेल्या सामन्यात भारताने बांग्लादेशचा पराभव करत पुन्हा एकदा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आपली जागा निश्चित केली. भारताच्या या विजयानंतर अभिनेता रणवीर सिंहला भलताच आनंद झाल्याचे दिसून आले. त्याने सोशल मीडियावर देखील आपला आनंद बोलून दाखवला. या सामन्यात जसप्रीत बुमराहने शानदार प्रदर्शन केले. 48 व्या षटकात बुमराहने शेवटच्या दोन सलग चेंडूवर यॉर्कर टाकत दोन विकेट घेत बांग्लादेशला पराभूत केले. बुमराहने या सामन्यात 55 धावा देत 4 विकेट घेतले. भारताच्या विजयात बुमराहाचा मोठा वाटा होता. त्यामुळेच रणवीर सिंहने सोशल मीडियावर बुमराहची जोरदार तारीफ केली.

बुमराहने इंस्टाग्रामवर टाकलेल्या फोटोवर रणवीर सिंहने केलेली कमेंट चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे. रणवीर सिंहने बुमराहच्या पोस्टवर लिहिले की, ‘जगातील नंबर वन गोलंदाज. हीरा आहेस तू हिरा. ज्यावेळी तू विकेट घेतलीस त्यावेळी लाखो लोकांचा श्वास थांबला होता.’

रणवीर सिंहचे क्रिकेटच्या प्रती असलेले प्रेम नेहमीच पाहायला मिळाले आहे. यंदाच्या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान झालेल्या सामन्यात रणवीर कॉमेंट्री करताना सुध्दा दिसला होता.

Leave a Comment