चेंडू लागलेल्या मुलीला रोहित शर्माने भेट दिली ऑटोग्राफ केलेली टोपी


यंदाच्या विश्वचषकात अनेक विक्रम बनत आहेत आणि तुटत आहे. भारताचा सलामीवीर रोहित शर्माने देखील बांग्लादेश विरूध्दच्या सामन्यात शतक ठोकत एक नवीन विक्रम आपल्या नावावर केला. मात्र जेव्हा रोहित शर्मा षटकार आणि चौकाराच्या साह्याने आपले शतक पुर्ण करत होता तेव्हा असे काही घडले की, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. रोहित शर्माने मारलेला एक षटकार मॅच पाहायला आलेल्या मीना नावाच्या एक चाहतीला लागला. मात्र रोहित शर्माने सामना संपल्यावर असे काही केले की, ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

रोहित शर्माने सामना संपल्यावर चेंडू लागलेल्या मीना नावाच्या मुलीला बोलवून तिला खास ऑटोग्राफ केलेली टोपी म्हणून भेट दिली. ऑटोग्राफ केलेली टोपी रोहित शर्माकडूनच मिळाल्याने मुलगी देखील खुष झाली. यावेळी रोहित शर्माने मीनाला कॅच कसा पकडायचा हे देखील सांगितले.

तसेच, सामन्यानंतर रोहित शर्माने भारतीय संघाची फॅन 87 वर्षीय आजीची देखील भेट घेतली. भारत आणि बांग्लादेश यांच्या सामन्यात 87 वर्षीय आजी देखील भारतीय संघाला चीअर कराताना दिसत होती. सामन्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि शतकवीर रोहित शर्माने या आजीबाईची भेट घेतली.

Leave a Comment