महिलेच्या शापाने एका रात्रीत गायब झाले संपुर्ण गाव


जैसलमेरपासून 18 किलोमीटर दूर वसलेले एक गाव आता पर्यंटन केंद्र म्हणून प्रसिध्द झाले आहे. हजारो लोक येथे रोज पर्यटनासाठी येत असतात. मात्र आजपासून जवळपास 170 वर्षापुर्वी कुलधरा गावातील लोक एका रात्रीत असे काही गायब झाले की, कोणालाच त्याचा पत्ता देखील लागला नाही.

हे गाव एका रात्रीत का खाली झाले ? कोणत्या समाजातील लोक येथे राहत होते ? या गावात राहणारे लोक कोठे गेले ? पुन्हा हे गाव का वसले नाही ?, असे अनेक प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. कुलधरा नावाचे हे एक छोटेसे गाव. सांगण्यात येते की, सन् 1291 च्या जवळपास श्रीमंत आणि मेहनती पालीवाल ब्राम्हणांनी 600 घरांच्या या गावाला वसवले होते. या गावाच्या आसपास 84 गावे होती व ती सर्व पालीवाल ब्राम्हणांनीच वसवली होती.

हे ब्राम्हण मेहनती तर होतेच पण त्यांच्याकडे वैज्ञानिक दृष्टीकोन देखील होता. कुलधरामध्ये सापडलेल्या अवशेषावरून स्पष्ट होते की, येथील घरे वैज्ञानिक आधारावरच बनवली गेली होती. हे पालीवाल ब्राम्हण शेती आणि गोपालनावरच निर्भर होते. आनंदात जगणाऱ्या या ब्राम्हणांवर दीवान असलेल्या सालम सिंहची नजर पडली. सालम सिंहला एक ब्राम्हण मुलगी आवडली होती. मात्र गावकऱ्यांचा याला विरोध होता. अनेक प्रयत्न केल्यानंतर देखील मुलगी न मिळाल्याने सालम सिंहने गावकऱ्यांना थेट धमकीच दिली. येणाऱ्या पौर्णिमेपर्यंत मुलीला द्या नाहीतर, तो स्वतः त्या मुलीला उचलून नेईल अशी धमकी त्याने गावकऱ्यांना दिली. गावकरी काहीही झाले तरी त्या मुलीला देण्यास तयार नव्हते. मुलीला सालम सिंहला देऊन गावकरी गाव वाचवू शकत होते. मात्र त्यांनी दुसरा रस्ता निवडला.

एका रात्री गावातील 84 ब्राम्हणांनी बैठक घेत अखेर गाव सोडण्याचा निर्णय घेतला. केवळ एका रात्रीत आसपासचे सर्वच्या सर्व गावे खाली झाली होती. मात्र जाता-जाता ते लोक गावाला शाप देऊन गेले. या ठिकाणी कोणीच नाही वसू शकणार, जो कोणी प्रयत्न करेल तो बर्बाद होईल, असा शापच त्यांनी दिला. कुलधराच्या या उजाड जमीनचा पाठलाग तो शाप आजही करत आहे. त्यामुळेच तेथे राहण्याचा प्रयत्न करणारा प्रत्येक जण बर्बाद झाला व आजही कोणीच तेथे राहण्याचा प्रयत्न करत नाही.

Leave a Comment