सरसंघचालकांची ट्विटरवर एंट्री


नवी दिल्ली – ट्विटरवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची एंट्री झाली असून नुकतेच त्यांनी स्वतःचे ट्विटर अकाऊंट सुरू केले आहे. त्यांनी त्यावर अद्याप एकही ट्विट केलेले नाही. पण त्यांना ट्विट करण्यापूर्वीच २४ हजारहून अधिक फॉलोअर्स मिळाले आहेत. केवळ आरएसएसला ते सध्या फॉलो करत आहेत.

@DrMohanBhagwat असे सरसंघचालकांचे ट्विटर हँण्डलर आहे. मे महिन्यातच त्यांचे हे ट्विटर अकाउंट तयार झाले होते, पण ते संघाकडून अधिकृतरित्या नुकतेच सक्रिय करण्यात आले. त्यांच्यासह सरकार्यवाह भैय्याजी जोशी, सह सरकार्यवाह सुरेश सोनी, कृष्ण गोपाल, व्ही. भागय्या, प्रचार प्रमुख अरूण कुमार आणि अनिरूद्ध देशपांडे यांनीही ट्विटरवर पदार्पण केले आहे. सरसंघचालकांना फॉलो करणाऱ्यांमध्ये रामदेव बाबा, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आदी व्यक्तींचा समावेश आहे. तर, संघाच्या ट्विटर पेजचे १.३ दशलक्ष फॉलोअर आहेत.

Leave a Comment