व्हॉट्सअपमधील सर्वात मोठे फीचर होणार बंद


अमेरिकेतील ट्रम्प सरकार एंड टू एंड एन्क्रिप्शन सिस्टम बंद करण्याचा विचार करत असल्याचे वृत्त अमेरिकी मॅगजीन पॉलिटीकोने दिले असून एन्क्रिप्शन या सिस्टममुळे जगात सर्वाधिक वापरला जाणारा इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप हे ओळखले जाते. त्याचबरोबर एंड टू एंड एन्क्रिप्शनवर अॅपलचे मेसेज आणि फेस टाईमही आधारीत आहे. पण ही सिस्टम ट्रम्प सरकार हटवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जर व्हॉट्सअॅपमधून एंड टू एंड एन्क्रिप्शन सिस्टम हटवली, तर व्हॉट्सअॅप, आयफोन सारख्या मोठ्या कंपन्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. प्रत्येक यूजर्सला एंड टू एंड एन्क्रिप्शनमुळे प्रायव्हसी मिळते. पण हीच सिस्टम आता बंद होणार असेल, तर यूजर्सही प्रायव्हेसी नसलेले अॅप अनइन्स्टॉल करतील.

एंड टू एंड एन्क्रिप्शन ही एक सिस्टम असून आपण जर व्हॉट्सअॅपवर चॅटिंग केले, तर ते मेसेज फक्त सेंडर आणि रिसिव्हर वाचू शकतात. कोणतीही कंपनी किंवा इतर कोणत्याही देशातील कायदा एन्क्रिप्शन सिस्टममुळे आपले मेसेज वाचू शकत नाही. जगभरात या अॅपला प्रायव्हसीसाठी पसंती दिली जात आहे. पण या अॅपवर काही देशात बंदी घातली आहे. पण जर एन्क्रिप्शन सिस्टम बंद केली, तर यूजर्सच्या प्रायव्हसीला धोका निर्माण होऊ शकतो.

पॉलिटीकोच्या एका रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, नुकतेच या एन्क्रिप्शन सिस्टमवर ट्रम्प प्रशासन चर्चा करत होते. तसेच नॅशनल सिक्युरिटी काऊन्सलिंगच्या मीटिंगमध्येही एंड टू एंड एन्क्रिप्शनवर चर्चा करण्यात आली होती. दरम्यान, यावर अजून कोणता निर्णय घेण्यात आला नाही. एंड टू एंड एन्क्रिप्शनवर सध्या चर्चा सुरु आहे, ही सिस्टम बंद करायची की यामध्ये बदल करायचा यावर चर्चा सुरु आहे. अॅपलवरही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी ट्रम्प यांनी टीका केली होती.

एंड टू एंड एन्क्रिप्शन सिस्टम जर हटवण्यात आली, तर भारतातही याचा फरक पडू शकतो. कारण भारतात सर्वाधिक व्हॉट्सअॅपचे यूजर्स आहेत आणि एंड टू एंड एन्क्रिप्शनचा व्हॉट्सअॅपही वापर करते. जर एंड टू एंड एनक्रिप्शन व्हॉट्सअॅपमधून हटवण्यात आले, तर व्हॉट्सअॅपची ओळख संपून जाईल. आता यावर ट्रम्प सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणि टेक कंपनीही यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment