मोदींना माझे मत जाणून घेण्यात स्वारस्य नाही – सुब्रमण्यम स्वामी


नवी दिल्ली – राज्यसभा खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत ट्विट करताना माझे विचार जाणून घेण्यात मोदींना स्वारस्य नसल्यामुळे माझे विचार मांडण्यासाठी मी चीनला जात असल्याचे म्हटले आहे. माझे विचार जाणून घेण्यात ‘नमों’ना रस नसल्याचे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही नेटकऱ्यांनी स्वामींच्या या ट्विटनंतर आश्चर्य व्यक्त केले. तर, त्यांना काहींनी मजेशीर सल्ले द्यायला सुरुवात केली आहे.


सप्टेंबरमध्ये मला चीनमधील सिंघ्वा विद्यापीठात उच्च विद्याविभूषित लोकांसमोर आपले विचार मांडण्यासाठी निमंत्रित केले आहे. गेल्या सत्तर वर्षातील चीनचा आर्थिक विकास हा विषय मला यासाठी देण्यात आला आहे. माझे विचार जाणून घेण्यात नरेंद्र मोदींना रस नाही. मी या परिस्थितीत चीनला जाऊ शकतो, असे स्वामींनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

अवघ्या २४ व्या वर्षी लंडनच्या हॉवर्ड विद्यापीठातून सुब्रमण्यम स्वामी यांनी पीएचडी मिळवली होती. त्यानंतर २७ व्या वर्षी त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातच विद्यादानाचे काम सुरु केले. त्यानंतर १९६८ मध्ये त्यांना दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून संशोधनासाठी बोलावणे आले आणि त्यानंतर ते १९६९ पासून आयआयटी दिल्लीतच रमले.

Leave a Comment