कॅन्सरवर शास्त्रज्ञांना सापडला आशेचा किरण


न्यूयॉर्क : देव न करो पण आपल्यापैकी जर कोणाला कॅन्सरसारखा भयंकर रोग असल्याचे निदान झाल्यास आपल्यासह आपल्या कुटुंबियांच्या देखील काळजाचा ठेका चुकतो. यारोगावरील उपचारासाठी आतापर्यंत अनेक संशोधन करण्यात पण त्यात म्हणावे तसे यश मिळाले नाही. त्यातच आता शास्त्रज्ञांना या असाध्य रोगावर आशेचा किरण सापडला आहे. या रोगाबाबत काही प्रगत देशांमध्ये केलेल्या संशोधनात Human papilloma virus म्हणजेच HPV ही लस गुणकारी ठरल्याचा दावा न्यूयॉर्क टाईम्सने केला आहे. टाईम्सने हा दावा जगप्रसिद्ध ‘लॅन्सेट’ या मासिक एक संशोधन अहवाल देण्यात आल्याचा संदर्भ देत केला आहे.

हा दावा विविध 12 देशांमध्ये सुरू असलेल्या संशोधनाच्या आधारे करण्यात आला आहे. हे प्रयोग या प्रगत आणि श्रीमंत देशांमध्ये 30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 6 कोटी 60 लाख युवक आणि युवतींवर करण्यात आले. HPV लसीचा व्यापक प्रमाणात प्रसार करण्यात आला तर गर्भशयाच्या कॅन्सरचे प्रमाण एकदम कमी होऊ शकते असा दावा करण्यात आला आहे.

गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण श्रीमंत देशांमध्ये कमी असते. कारण तेथे याचे निदान झाल्यावर लगेच त्यावर अत्याधुनिक उपचाराच्या सोयी उपलब्ध असतात. पण गरीब आणि विकसनशील देशांमध्ये ही सोय उपलब्ध नसते. त्यामुळे अशा देशांमध्ये ही लस अतिशय प्रभावी ठरू शकते असा दावा या संशोधनात करण्यात आला आहे. गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे गरीब देशांमध्ये दरवर्षी 3 लाख महिलांचा मृत्यू होते. त्याचे प्रमाण ही लस दिल्यास लक्षणीय कमी होऊ शकते असा या शास्त्रज्ञांचा दावा आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment