एका सॅनेटरी पॅडसाठी येथील महिला करत आहेत देहविक्री


आज जगभरात महिलांच्या मासिक पाळीबाबत जागरूकता पसरविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. असे असले तरीही, लोकांमध्ये जागरूकता दिसून येत नाही. फक्त भारतच नाही तर जगातील अनेक देशात मासिक पाळी हा विषय वर्ज्य समजला जातो. अफ्रिका खंडातील केनिया सारख्या देशातील गोष्ट देखील अशीच आहे. येथे आजही महिलांच्या मासिक पाळी संबंधीत मुद्यांवर बोलले जात नाही. केनियाची राजधानी नैरोबीमध्ये अनेक भागात सॅनेटरी प्रॉडक्टससाठी महिला आणि मुलींना चक्क देहविक्री करावी लागत आहे.

युनिसेफच्या एका रिसर्चमध्ये हा आश्चर्यकारक आकडा समोर आला असून, यानुसार नैरोबीच्या आजूबाजूच्या भागात 65 टक्के महिलांना फक्त एका सॅनेटरी पॅडसाठी देहविक्री करावी लागत आहे. एका स्वयंसेवी संस्थेच्या सर्वेक्षणामध्ये असे समोर आले की, पश्चिम केनियामध्ये जवळपास 10 टक्के महिला अशा आहेत, ज्यांनी लग्नाच्या आधी केवळ एका पॅडसाठी आपल्या शरीराचा सौदा केला आहे. युनिसेफनुसार, केनियातील 54 टक्के महिलांसाठी सॅनेटरी पॅडसारखे हायजिन प्रोडक्ट उपलब्ध नाही.

केन्यातील युनिसेफचे मुख्य अधिकारी एंड्रयू ट्रेवेंट यांच्यानुसार, ही गोष्ट येथील लोकांसाठी काही नवीन नाही. येथील काही भागांमध्ये एवढी गरीबी आहे की, मुली टॅक्सी ड्रायव्हरबरोबर देखील संबंध ठेवण्यास मागेपुढे पाहत नाही. याबदल्यात त्यांना सॅनटरी सारख्या वस्तू मिळतात. यामागे दोन कारणे आहेत. एक म्हणजे गरीबी आणि दुसरे कारण म्हणजे या भागात हायजिन प्रोडक्ट न मिळणे. महिला ते खरेदी करण्यासाठी शहरापर्यंत जाऊ शकत नाही. ते आणण्यासाठी रोडची आणि बसची देखील सोय नाही. मासिक पाळीबद्दल येथे लोक बोलत देखील नाही, असे एंड्रयू यांनी सांगितले.

Leave a Comment