मुंबई महापालिकेची महानायकाने देखील घेतली फिरकी!


सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वसामान्यांचे हाल झालेच आहेत पण यातून सिने कलावंत देखील सुटलेले नाहीत. मुंबई शहरातील बहुतांश भागात सततच्या मुसळधार पावसामुळे पाणी साचले. यात सर्वाधिक पाणी जुहूमध्ये साचले. बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याबाहेर रस्त्यावर पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली.


दरम्यान मुंबईच्या पावसावर स्वतः अमिताभ यांनी एक ट्विट केले आहे. त्यांनी या ट्विटमध्ये पावसामुळे हाल होणाऱ्या प्रवाशांबद्दल चिंता व्यक्त न करता महागरपालिकेवरच ताशेरे ओढले आहेत. आपल्या चित्रपटातील एक फोटो बच्चन यांनी शेअर केला आहे. यात त्यांच्यासोबत झीनत अमान दिसत आहेत. ते यात एका होडीत बसले आहेत. त्यांनी या फोटोला कॅप्शन देताना लिहिले की, दादा, जरा गोरेगावला न्या. या फोटोच्यावर त्यांनी टी ३ ‘जलसावरून..’ असा मेसेजही लिहिला. दरम्यान, पावसाने तूर्तास जरी उसंत घेतली असली तरीही हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Leave a Comment