सचिनची ११९ वर्षे जुन्या विंटेजमधून सफारी


मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकर सध्या क्रिकेट वर्ल्ड कपसाठी इंग्लंड मध्ये आहे. सचिन कार शौकीन आहे आणि त्याचे हे कार प्रेम अनेकदा अनेक स्वरुपात दिसले आहे. सचिनला नुकतेच इंग्लंडच्या वेल्श मध्ये ११९ वर्षे जुनी विंटेज कार चालविताना पाहिले गेले असून त्याचा एक व्हिडीओ सचिनने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

सचिनच्या संग्रही फेरारी पासून बीएमडब्ल्यू पर्यंत अनेक महागड्या कार्स आहेत तरीही त्याला जुन्या कार्सची तितकीच आवड आहे. सचिनच्या कार्स संबंधी नेहमीच चर्चा होत असते. त्याला फॉर्म्युला वन कार चालावितानाही पाहिले गेले आहे. मात्र लंडन मध्ये त्याने चालविलेली कार ११९ वर्षे जुनी आहे. डेमलरचे हे १९०० सालचे मॉडेल असून त्यावेळच्या कारपैकी ही एक आहे. अशीच एक कार त्याकाळी वेल्शचे प्रिन्स अल्बर्ट एडवर्ड याच्याकडे होती.


या कारला १५२६ सीसीचे ट्वीन सिलिंडर अल्युमिनियम इंजिन चार स्पीड ट्रान्समिशन सह आहे. या कारचा सर्वाधिक वेग ताशी ३६.६२ किमी असून तिला ड्युअल इग्निशन दिले गेले आहे. म्हणजे या कारला रेग्युलर स्टार्ट तंत्रज्ञानाबरोबर ओपन फ्लेम हॉट ट्यूब सुद्धा दिल्या गेल्या आहेत. म्हणजे काही कारणाने स्पार्क इंजिन फेल झाले, तर हॉट ट्यूबचा वापर करून कार सुरु करता येते. सध्याच्या कार्स मध्ये टेलर स्टिअरिंगचा वापर केलेला असतो, या कार मध्ये रेग्युलर स्टिअरिंग व्हील दिले गेले आहे. पायाने ऑपरेट करायचे एक्सलरेटर पॅडल च्या जागी हँड थ्रोटल आहे.

सचिनने पोस्ट केलेल्या व्हिडीओ मध्ये आणखी एक माणूस त्याच्या सोबत दिसतो आहे. तो सचिनला कार कशी चालवायची याची माहिती देत असावा. १९१७ पूर्वीच्या कार्स आणि आत्ताच्या कार्स यामध्ये खूपच फरक आहे. डिझाईन आणि इंजिनिअरींग मध्ये विंटेज कार्स खूपच वेगळ्या आहेत.

Leave a Comment