व्हॉट्सअॅपवर असे सुरु करा डार्क मोड


सध्याच्या घडीला सोशल नेटवर्किंगमध्ये फेसबुकचे इंस्टंट मेसेजिंग अॅप असलेल्या व्हॉट्सअॅपचे युजर्स लाखोच्या संख्येने आहेत. तर व्हॉट्सअॅप प्रत्येक वेळी आपल्या युजर्ससाठी प्रत्येक वेळी नवीन फिचर्स घेऊन येत असते. तर आता लवकरच व्हॉट्सअॅप डार्क मोड सुरु करणार आहे.

पण फेसबुक मेसेंजरने देखील गुगल क्रोम आणि इतर काही गुगल अ‍ॅप्सप्रमाणे आपल्या प्लॅटफॉर्मवर डार्क मोड फीचर्स उपलब्ध करुन दिले आहे. तुम्ही जर अँड्रॉईड स्मार्टफोनचा वापर करत असाल तर आधी तुमचा फोन अँड्रॉईड क्यूच्या बीटा व्हर्जनवर काम करत आहे का? अनेक अँड्रॉईड मोबाईल फोन अँड्रॉईड क्यूच्या लेटेस्ट बीटा व्हर्जनचा वापर करू शकतात. गुगल पिक्सलच्या काही स्मार्टफोनचा या लिस्टमध्ये समावेश आहे.

सर्वप्रथम स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये जाऊन डिस्प्ले ऑप्शनवर क्लिक करा. सिलेक्ट थीमवर क्लिक करून डार्क ऑप्शनवर क्लिक करा. सेटिंगमध्ये खाली देण्यात आलेल्या डेव्हल्पर्स ऑप्शनमध्ये जा. त्यानंतर त्याच्या सेटिंगमध्ये डेव्हल्पर ऑप्शन टॅब येत नसेल तर सेटिंगमध्ये अबाऊट फोन असलेल्या बिल्ड नंबरवर सात वेळा क्लिक करुन ते अ‍ॅक्टिवेट करू शकता. त्यानंतर सेटिंगमध्ये डेव्हल्पर ऑप्शनचा समावेश होईल. व्हॉट्सअॅप सेटिंगमध्ये जाऊन वॉलपेपर ऑप्शनवर क्लिक करून ननवर क्लिक करा असे केल्यास व्हॉट्सअ‍ॅप डार्क मोडवर काम करण्यास सुरुवात करेल.

Leave a Comment