शाहरुखला सचिनसोबत ‘मच्छीच्या सारा’वर मारायचा ताव


२७ वर्षांपूर्वी बॉलीवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान याने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्याच निमित्ताने शाहरुखने ट्विटरवर १९९२ मधील सुपरहिट ‘दिवाना’ या चित्रपटातील गाण्यातील बाईकवर स्टंट करीत असलेला व्हिडिओ शेअर केला होता. सचिन तेंडूलकरने या व्हिडिओवर आपली मजेशीर प्रतिक्रिया दिली होती.


आपल्या प्रतिक्रियेत सचिन म्हणतो, प्रिय बाजीगर, डोक्यावरुन हेल्मेट काढू नकोस. ‘जब तक है जहाँ’..जेव्हा बाईकवर असशील तेव्हा हेल्मेट वापर. सिनेसृष्टीत तुमची २७ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भरपूर शुभेच्छा. लवकरच भेटू. सचिनच्या या प्रतिक्रियेनंतर भरपूर प्रतिक्रिया आल्या आहेत.

आता शाहरुख खाननेही सचिनच्या कॉमेंटनंतर उत्तर देण्याचा प्रयत्न केला. याबाबत शाहरुखने केलेल्या रिट्विटमध्ये माझ्या मित्रा, हेल्मेट घालून ऑन ड्राईव्ह…ऑफ ड्राईव्ह आणि स्ट्रेट ड्राईव्ह मारणे तुझ्याहून चांगले कोण शिकवू शकते. ड्राईव्हिंगचे धडे मी ग्रेट सचिनकडून शिकलो आहे, माझ्या हे नातवांना सांगायचे आहे. मच्छीचे सार खायला लवकरच भेटू. आभारी असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment