आजपासून एवढ्या रुपयांनी स्वस्त झाला घरगुती गॅस सिलेंडर


नवी दिल्ली – इंडियन ऑईल कार्पोरेशनने नुकतीच विना अनुदानित घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 100.50 रुपयांची कपात करण्यात येणार असल्याची घोषणा केल्यामुळे, ही बातमी सर्वसामान्य नागरिकांसाठी नक्कीच आनंदाची ठरणार आहे. आजपासून हे नवे दर दिल्लीमध्ये लागू होणार आहेत.

सामान्य नागरिकांना इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या या निर्णयामुळे दिलासा मिळाला असून आता विना अनुदानित गॅस सिलेंडरसाठी ४९४.३५ रुपये द्यावे लागणार आहेत. हा निर्णय आंतरराष्ट्रीय बाजारात दरकपात झाल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत मजबुत झाल्याने घेण्यात आला आहे.

Leave a Comment