करिनाने शेअर केला ‘अंग्रेजी मीडियम’चा फर्स्ट लूक


चित्रपटसृष्टीत बॉलिवूडची बेबो अशी ओळख असणाऱ्या करिना कपूर खानला नुकतीच १९ वर्ष पूर्ण झाली असून तिने बॉलिवूडमध्ये ३० जून २००० ला ‘रिफ्यूजी’ या चित्रपटाद्वारे पदार्पण केले. करिना लवकरच ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याच दिवसाचे औचित्य साधत तिने या चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर केआला आहे.


मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत या चित्रपटात अभिनेता इरफान खान झळकणार आहे. होमी अदजानिया या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून दिनेश विजन यांची निर्मिती असणार आहे. या चित्रपटात करिना पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या लंडनमध्ये सुरू आहे.


दरम्यान अंग्रेजी मीडियम हा चित्रपट २०१७ मध्ये आलेल्या ‘हिंदी मीडियम’ चित्रपटाचा सिक्वल असणार आहे. अभिनेता इरफान खान ‘अंग्रेजी मीडियम’च्या माध्यमातून बऱ्याच दिवसांनंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. चित्रपटात करिना आणि इरफानशिवाय राधिका मदनचीही महत्त्वाची भूमिका असणार असून हा चित्रपट २०२० मध्ये २४ एप्रिलला रिलीज होणार आहे.

Leave a Comment