मागील महिन्याच्या २८ तारखेला आयुष्मान खुराणाचा ‘आर्टिकल १५’ हा चित्रपट रिलीज झाला. पहिल्या दिवशी दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांचे दिग्दर्शन असलेला या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता चित्रपटाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीच्या कमाईचे आकडे देखील समोर आले आहेत.
कबीर सिंहला जोरदार टक्कर देत आहे ‘आर्टिकल १५’
#Article15 jumps on Day 2… Trending very well at urban centres specifically… Should maintain the strong momentum on Day 3, although #INDvENG [#CWC19] cricket match might act as a speed breaker… Fri 5.02 cr, Sat 7.25 cr. Total: ₹ 12.27 cr. India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) June 30, 2019
मागच्या वर्षी आयुष्मानचे ‘अंधाधून’ आणि ‘बधाई हो’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरडुपरहिट ठरल्यानंतर तो आता ‘आर्टिकल १५’ मधुन पोलिसाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आला. जातीभेदासारख्या गंभीर विषयाला या चित्रपटाच्या माध्यमातून हात घातला आहे. त्यामुळे या चित्रपटाकडे चाहत्यांचे लक्ष लागले होते. पहिल्या दिवशी या चित्रपटाने ४-५ कोटींची कमाई केली. तर, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत भर पडली आहे. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ७.२५ कोटींची कमाई केली आहे. शाहिदच्या ‘कबीर सिंह’ची ‘आर्टिकल १५’ला बॉक्स ऑफिसवर टक्कर आहे. तरीही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे.