आता ट्रेन, बसमधील गर्दीची परिस्थिती सांगणार गुगल मॅप्स


मुंबई आणि दिल्लीकरांना गर्दी म्हणजे काय असते ते विचार, कारण गर्दीचा सामना करत ट्रेन किंवा बसमध्ये जागा मिळविण्यात या दोन्ही शहरातील नागरिकांचा हात कोणी पकडू शकत नाही. त्यातच कोणी नवखा या शहरांमध्ये गेला तर त्याच्या समोर गर्दीचा गहन प्रश्न उभा राहतो. पण त्याच समस्येचे निवारण गुगल मॅप्सच्या एका नव्या फिचरमुळे होणार आहे. गुगल मॅप्सने लाँच केलेल्या एका नव्या फीचरमुळे तुम्ही अॅपवरून आता प्रवासाचा रूट आणि वाहनासोबतच ट्रेनच्या वेळा आणि गर्दीचा सुद्धा अंदाज घेऊ शकणार आहात. त्यामुळे ट्रेन आणि बसमधून दररोज प्रवास करणाऱ्यांचा काही प्रमाणात त्रास कमी होणार आहे.


अॅंड्रॉइड आणि आयओएस यूजर्सना गुगल मॅप्सचे हे नवीन फीचर ट्रेनचे वेळापत्रक आणि गर्दीची माहिती पुरवणार आहे. प्रवाशांना यामध्ये बसण्यासाठी जागा उपलब्ध आहे, काहीच जागा रिकामी आहेत, उभे राहण्याची जागा आहे, जागा नाही अशा चार पर्यायात उत्तर मिळेल. प्रवासी यांचा अंदाज घेऊन मग आपली यात्रा प्लॅन करू शकतात. बस आणि ट्रेनच्या वेळांच्या माहिती सोबतच नव्या अपडेटसह यामधून आता रिक्षांच्या उपलब्धतेबाबतही माहिती दिली जात आहे. सध्या जगातील 200 प्रमुख शहरांमध्ये हे फीचर सुरु करण्यात आले आहे. संपूर्ण माहिती मिळताच याचा आणखी प्रसार करण्यात येणार आहे.

बस वाहतुकीसाठी गुगल मॅप्सने ‘लाइव्ह ट्रॅफिक डीले’ हे नवीन फीचर आणले आहे. इस्तांबूल, मनिला, जागरेब आणि अटलांटासारख्या जगातील प्रमुख शहरांत ते उपलब्ध करून देण्यात आले आहे. 6 कोटी यूजर्सना या फीचरच्या अचूक माहितीचा लाभ होत आहे. सर्वात आधी हे फीचर भारतात लाँच करण्यात आलं आहे, असे गुगलचे रिसर्च सायंटिस्ट एलेक्स फॅब्रिकँट यांनी सांगितले.

Leave a Comment