बाजारात आल्या पोटातील गॅसला सुगंधित करणाऱ्या फर्ट गोळ्या


आपल्यापैकी बहुतेक जणांना कधी ना कधी गॅसची समस्या होतेच. तर बद्धकोष्ठचा कायमच काहीजणांना त्रास असतो, अशावेळी जेव्हा तुम्ही गॅस सोडता आणि त्याची दुर्घंधी इतरांपर्यंत पोहचते, तेव्हा सर्वात जास्त लाज वाटते. पण या समस्येवर आता एक जालीम उपाय बाजारात आला आहे. जेव्हा तुम्ही गॅस सोडाल तेव्हा दुर्गंध नाही तर चक्क सुगंध दरवळणार आहे. अशा प्रकारचे औषध फ्रांसच्या एका कंपनीने बनवले आहे, तुमची आणि इतरांचीही गॅसच्या दुर्गंधीपासून जे घेतल्यावर सुटका होणार आहे.

ख्रिश्चन पोइन्चेवल यांचे या औषध निर्मिती मागे डोके आहे, अशा प्रकारच्या गोळ्या आणि पावडर ज्यांनी तयार केली आहे. या गोळ्या 60 च्या पॅकसाठी फ्रेंच कंपनी पिलूलपेटने 20 पौंड एवढी किंमत ठेवली आहे. कंपनीने याबाबत असा दावा केला आहे, नैसर्गिक घटकांपासून या गोळ्या बनविल्या जात असल्याने कोणताही साईड इफेक्ट त्याचा होत नाही. हे औषध प्राण्यांसाठीही तुम्ही वापरू शकता. या गोळ्यांची पावडर प्राण्यांच्या खाद्यपदार्थांमध्ये मिक्स केल्याने प्राण्यांच्याही गॅसचा येणारा वास हा सुगंधामध्ये परावर्तित होणार आहे.

गेली अनेक वर्षे हे औषध तयार करण्याचा प्रयत्न कंपनी करत होती, त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. कंपनी सध्या गुलाब, चॉकलेट अशा विविध फ्लेवरमध्ये या गोळ्या विकत आहे. कंपनीचे संकेतस्थळ लुटिन मालिन (Lutin Malin) वर या गोळ्यांची सर्व माहिती देण्यात आली असल्यामुळे तुम्हाला किंवा तुमच्या आसपासच्या इतर कोणालाही सुगंधी गॅस हवा असेल तर या गोळ्या ट्राय करू शकता.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment