धनकुबेर मार्क झुकेरबर्ग वापरतो होंडा फिट कार


जगातील श्रीमंतांच्या यादीत ६ व्या स्थानावर असलेला फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉटसअप सारख्या सोशल मिडिया जायंट कंपन्याचा मालक मार्क झुकेरबर्ग याची वेगळी ओळख करून देण्याची गरज तरुणाईला तरी नाही. १४ मे २०१९ रोजी ३५ वा वाढदिवस साजऱ्या केलेल्या मार्कची लाईफस्टाईल, त्याच्या सुरक्षेवर होत असलेला खर्च, त्याची संपत्ती, त्याची बायको, मुले याविषयी सतत चर्चा होत असते. रविवारी वर्ल्ड सोशल मिडिया डे जगभरात साजरा झाला त्या निमित्ताने धनकुबेर मार्क झुकेरबर्ग यांच्या विषयी आणखी थोडी माहिती करून घेणे मनोरंजक ठरेल.

आजघडीला जगात दर तीन माणसांमागे एक फेसबुक युजर आहे. मार्कची संपत्ती ६७ अब्ज डॉलर्सची आहे. मात्र त्याला फार पैसा खर्च करायला आवडत नाही अशी त्याची राहणी पहिली की खात्री पटते. त्याचे एकाच रंगाचे टी शर्ट ही तर त्याची खास ओळख बनली आहे. अर्थात भरपूर पैसा असलेले किंवा थोडा अधिक पैसा मिळतोय असे वाटले कि अनेकांना महागड्या अलिशान कार्स घ्याव्या वाटतात आणि तश्या त्या घेतल्या जातात. येथेही मार्क या साऱ्यांपेक्षा वेगळा ठरतो.


मार्कच्या संग्रही महागड्या गाड्या आहेत मात्र त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच आहे. विशेष म्हणजे मार्क स्वतः कार्यालयात जाण्यायेण्यासाठी गेली कित्येक वर्षे होंडा फिट या हचबॅक कारचा वापर करतो. भारतात ही कार होंडा जाझ नावाने विकली जाते आणि तिची किंमत आहे ३० हजार डॉलर्स म्हणजे २१ लाख रुपये. या कारला १.५ लिटरचे पेट्रोल इंजिन असून ती फाईव डोअर कार आहे.

मार्कला वारंवार रेस्टॉरंट मध्ये जाणे आवडत नाही. मार्कच्या संग्रही रेनोल्ट निस्सानची इन्फिनिटी जी सेदान, होंडाचीच अक्युरा, या शिवाय दोन सीटर इटालियन मेकची पगानी हुयारा ही स्पोर्ट्स कार आहे. त्याच्या संग्रहातील ही सर्वात महागडी कार असून तिची किंमत आहे ८.५०,००० पौड्स.

Leave a Comment