दुबईतून राजकुमारी हया यांचे पलायन


दुबईचे पंतप्रधान आणि उपराष्ट्रपती शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांची सहावी पत्नी राजकुमारी हया बिन अल हुसेन यांनी त्यांची दोन मुले आणि सुमारे २७१ कोटींची रक्कम यासह देशातून पलायन केल्याचे समजते. मिडिया रिपोर्ट नुसार ह्या यांनी सध्या लंडन मध्ये अज्ञात स्थळी आसरा घेतला आहे. त्या जॉर्डनचे राजे अब्दुल्ला यांची सावत्र बहिण आहेत.

दुबईतून पलायन केल्यावर त्यांनी प्रथम जर्मनीत जाऊन तेथून घटस्फोटाची मागणी केली होती. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी जलीला वय ११ आणि मुलगा जायेद वय ७ हेही आहेत. त्यांनी जर्मनीकडे राजकीय आश्रय मागितला होता असे समजते. दुबईतून बाहेर पाडण्यासाठी त्यांना जर्मन राजदूताने मदत केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. राजकुमारी ह्या ऑक्सफर्डच्या पदवीधर आहेत. २० मे नंतर त्या कोणत्याच सार्वजनिक कार्यक्रमात दिसलेल्या नाहीत. तसेच त्या फेसबुक अकौंटवर सक्रीय राहिलेल्या नाहीत. यापूर्वी त्या या अकौंटवरून त्याचे चॅरिटेबल कार्याचे फोटो शेअर करत असत.


शेख मोहम्मद यांनी ह्या यांना जर्मनीतून परत पाठविले जावे असा आग्रह धरला होता पण त्याला जर्मनीने नकार दिला होता असेही सांगितले जात आहे. यापूर्वी शेख मोहम्मद यांची कन्या राजकुमारी लतीफा यांनीही देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता मात्र भारतीय किनार्यावर त्यांना पकडले गेले होते. तेव्हापासून त्या गायब आहेत. त्यांना दुबईत नजरकैदेत ठेवले गेल्याचे काही लोकांचे म्हणजे आहे. वडिलांच्या अत्याचाराला कंटाळून त्यांनी देशातून पळून जायचा निर्णय घेतला होता असेही समजते.

Leave a Comment