पावसाळ्यात भटकण्यासाठी रम्य ठिकाणे

मुंबई – पावसाळा हा सिझन पायी भटकणार्‍या ट्रेकर्ससाठी ङ्गारच योग्य सिझन असतो. पडत्या पावसात किंवा पावसाळी हवामानात निसर्गाच्या सान्निध्यात पायी चालण्यामध्ये ङ्गार मजा येते. पावसाचा असा अनुभव लुटण्यास उत्सुक असलेल्या मुंबईकरांसाठी मुंबईच्या आसपास अशी काही पर्यटनस्थळे आहेत की, या ठिकाणी पायी भटकण्याचा आनंद मनसोक्त लुटता येतो.
Malsege-Ghat
माळशेज घाट हा मुंबईच्या ईशान्येला १२५ कि.मी. वर आहे. हा घाट ओलांडला की, अहमदनगर जिल्हा सुरू होतो. या भागात भरपूर पाऊस पडतो आणि पांढर्‍या स्वच्छ पाण्याचे अनेक धबधबे या घाटात आहेत. या भागातच खिरेश्‍वर तलाव आहे. या तलावाचे सौंदर्य उन्हाळ्यात सुद्धा कायम असते. या घाटातल्या हरिश्‍चंद्र गडावर स्वारी करणे हा तर पर्यटकांचा आनंदाचा क्षण असतो.
Harishchandragad
मुंबईच्या नैऋत्येला १५० कि.मी. वर असलेला मुळशी डॅम हेही एक उत्तम पावसाळी पर्यटन केंद्र आहे. या परिसरातली पागोटा आणि हत्तीहंट हिल्स् या दोन भागांना भेट देणे आणि या भागातली शिखरे पादाक्रांत करणे हा मोठा साहसी प्रकार असतो.
Lohagad-Fort
मुंबईपासून ९८ कि.मी. आग्नेयेला असलेला लोहगड किल्ला हा सुद्धा पर्यटकांना आकृष्ट करत असतो. लोहगडापर्यंत वाहनाने जाता येते, परंतु मनवळीपर्यंत वाहनाने जाऊन लोहगडापर्यंत पडत्या पावसात पायी जाण्यात एक मजा असते. तिकोना आणि तुंग हिल्स् हे सुद्धा पर्यटकांना आणि ट्रेकर्सना आनंद देणारी ठिकाणे आहेत.

Leave a Comment