पर्यटकांनी फुलला माळशेज घाट

malshej
कसारा – राज्यात मान्सून आता चांगलाच सक्रिय झाला आहे. पर्यटकांना आता मुरबाड तालुक्यातील माळशेज घाट साद घालू लागला आहे. यामुळे माळशेज घाटात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.

मुरबाड पासून माळशेज घाट अवघ्या ५० किलो मीटर अंतरावर आहे. पावसाळी सहलीसाठी माळशेज घाट हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. याठिकाणी नाणेघाट आणि माळशेज घाट असे दोन घाट आहेत. या घाटाचे वैशिष्ट म्हणजे धबधबे आणि खोल दरी.

माळशेज घाटाच्या पायथ्यापासून टोकापर्यंत रस्त्यालगत अनेक धबधबे आहेत. त्यामुळे पर्यटकांना पायी चालावे लागत नाही. पर्यटकांच्या सुरक्षेचीही काळजी घेतली जात आहे. रस्त्या लगत वाहन तळ बनविण्यात आले आहे.

पावसाळ्यातील अप्रतिम निसर्ग सौंदर्य धुक्याने वेढलेले डोंगर माथे गारठवणा-या पाण्याचे धबधबे अशा अनेक सौंदर्याने नटलेले माळशेज घाट पाहण्यासाठी पुणे, मुंबई, ठाणे नगर या भागातून पर्यटक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत आहेत.

Leave a Comment