भारतातले सुप्रसिध्द धबधबे

नवी दिल्ली : भारत हा भरपूर पाऊस पडणारा देश आहे. त्याचबरोबर जंगलांमध्ये आणि डोंगरदर्‍यांमध्ये अशा काही साईटस् आहेत की जिथे पाऊस पडताच प्रचंड मोठे धबधबे कोसळायला लागतात. लहानापासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच धबधब्यांचे आकर्षण असते. भारतात सर्वात उंचीवरून कोसळणारा नोखालीखाई या धबधब्यापासून ते ठाण्या जिल्ह्यातल्या छोट्या मोठ्या धबधब्यांपर्यंत अनेक धबधब्यांनी नैसर्गिक आकर्षण निर्माण केलेले आहे आणि त्यांच्याकडे पर्यटक मोठ्या संख्येने आकृष्ट होत आहेत. यातले काही धबधबे चित्रपटाच्या चित्रिकरणात आल्यामुळे त्यांची लोकप्रियता आणखी वाढली आहे.

Niagara-waterfall

भारताचा नायगरा धबधबा म्हणून ओळखला जाणारा केरळातला अतिरपिल्ली धबधबा हा ५९०फूट उंचावरून कोसळतो आणि तो भारतातला सर्वात सुंदर धबधबा म्हणून ओळखला जातो. चित्रपटामध्ये नैसर्गिक दृश्यांचे चित्रिकरण करताना चित्रपट निर्माते हमखास अतिरपिल्लीला जातात. त्या खालोखाल कावेरी नदीवर तामिळनाडूमध्ये असलेला भारचुक्की धबधबा हाही एक सुंदर धबधबा म्हणून ओळखला जातो. विशेषतः हा धबधबा खाली पडल्यानंतर ङ्गार सुंदर दिसतो.

Dudhsagar-waterfall

गोव्यामधील दुधसागर धबधबा १०२०फूटवरून खाली पडतो परंतु पडतानाचा पाण्याचा रंग दुधासारखा असतो त्यामुळे तो अतीशय नयनमनोहर वाटतो.

Hogenakkal-waterfalls

तामिळनाडूतील धर्मपुरी जिल्ह्यातील होगेनक्कल धबधबा हा सुध्दा ७५० फूट उंचीवरून पडतो मात्र तो आपटत आपटत पडत असल्यामुळे प्रत्येक टप्प्यावर त्याचे उडणारे पाणी डोळ्याचे पारणे ङ्गेडते. कर्नाटकातील शरावती नदीवरील जोग धबधबा तर सर्वांना माहीतच आहे. ८००फूट उंचीवरून कोसळणारा हा धबधबा जगातल्या अनेक लोकांच्या आकर्षणाचा विषय ठरलेला आहे. मेघालयाच्या पूर्व खासी हिल्स या जिल्ह्यातील नोखालीखाई इथला हा धबधबा ११०० फूट उंचीवरून कोसळतो आणि तो भारतातला सर्वात मोठा धबधबा आहे. सूचीपारा (जिल्हा वायनाड, केरळ) हा थ्री टायर धबधबा, महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील ठोसेघरचा धबधबा आणि नर्मदेवरचा धुवॉंधार धबधबा हेही धबधबे भारताच्या पर्यटक आकर्षणात भर घालणारे आहेत.

Leave a Comment