जपानी तरुणीने सुंदर दिसण्यासाठी खर्च केले कोट्यावधी रुपये खर्च


टोकियो – आपल्या लहाणपणी फक्त तू सुंदर दिसत नाही एवढेच जपानच्या सुबाकी तोमोमी या तरुणीला तिच्या आईने म्हटले होते. आपल्या आईचे बोलणे तिने एवढे मनावर घेतले की, तिने त्यानंतर सुंदर दिसण्याचे आपल्या मनाशी ठरवून त्यासाठी सुबाकीने गत २१ वर्षांत स्वत:च्या चेहऱ्यावर अनेकदा शस्त्रक्रिया करून सुमारे १ कोटी ९४ लाख रुपये (दोन लाख ३० हजार डॉलर्स) खर्च केले.

एका विमान कंपनीत हवाई सुंदरी म्हणून आता ३९ वर्षांच्या असलेल्या सुबाकीने काम केले आहे. १८ वर्षांची असताना तिने पहिली प्लास्टिक सर्जरी तिने केली होती. त्यानंतर २० व्या वर्षी दात व्यवस्थित केले व डोळ्यांचा आकार चांगला करण्यासाठी शस्त्रक्रिया केली. त्यात विशेष म्हणजे, एवढ्या शस्त्रक्रिया करूनही तिचे मन भरलेले नाही. सुंदर दिसण्यासाठी मी ३०० प्रकारच्या लहान-मोठ्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. तसेच यासाठी मरेपर्यंत प्रयत्न करत राहीन, असे तिने म्हटले आहे.

याबाबत सुबाकी सांगते की, माझ्या मनात मी सुंदर नसल्याची बाब लहानपणापासूनच घर करून राहिली होती. त्यामुळे अधिक सुंदर व आकर्षक दिसण्यासाठी काहीही करण्याचे ठरवून टाकले. लहानपणी माझी आई मला मी सुंदर दिसत नसल्याने नववर्ष, बोन फेस्टिवल आदी कार्यक्रमांत आमच्या घरी येणाऱ्या मित्रमंडळीसह नातेवाइकांना भेटू देत नव्हती. त्यामुळे मला खूप अपमानास्पद वाटत होते. मी त्यावर आईला मित्र व नातेवाइकांसमोर मला अपमानित करत जाऊ नकोस, असे सांगायची; परंतु तू सुंदर दिसत नसल्याने इतरांना भेटू नकोस, असे नेहमीचे उत्तर ती द्यायची. यास कंटाळून मी पैशांची बचत करणे सुरू केले. त्यानंतर कॉस्मेटिक सर्जरी केली. त्यामुळे मला हवाई सुंदरीची नाेकरी मिळाली व नाेकरीच्या पैशांतील बहुतांश रक्कम शस्त्रक्रियांवर खर्च केली, असे सुबाकीने सांगितले.

Leave a Comment