नेपाळमध्ये भारतीय चलनातील या नोटांवर देखील बंदी


काठमांडू – भारतीय चलनातील नोटांवर बंदी घालण्याचा निर्णय नेपाळ सरकारने अद्यापही कायम ठेवला असून सुरुवातीला दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांवर नेपाळ सरकारने बंदी घातली होती. त्यानंतर भारतीय चलनाच्या दोनशे रुपयांच्या नोटांवरही आता नेपाळ सरकारने बंदी घातली आहे.

काठमांडू येथे आयोजित मंत्री परिषदेत नेपाळचे माहिती आणि प्रसारण मंत्री गोकुल बास्कोटा यांनी सांगितले की, नेपाळमध्ये भारतीय चलनाच्या दोनशे रुपयांच्या नोटेवर बंदी घालण्यात आली आहे. नेपाळ सरकारच्या या घोषणेनंतर कोणत्याही सरकारी किंवा निमसरकारी संस्था, व्यापारी संस्था आदींमध्ये आता दोन हजार, पाचशे आणि दोनशे रुपयांच्या नोटा मान्यताप्राप्त असणार नाहीत.

पाकिस्तानमध्ये गेल्या काही काळात भारतीय चलनाच्या नकली नोटा प्रचंड मोठ्या प्रमाणावर पकडण्यात आल्या आहेत. तसेच, या नोटा सापडण्याचे प्रमाणही मोठे आहे. तसेच पाकिस्तानी नागरिकांकडे या नोटा खऱ्या की खोट्या हे ओळखण्याचे कोणतेही साधन अथवा मार्ग नाही. त्यामुळे या नोटा ओळखायच्या कशा याबाबत नागरिकांसमोर मोठाच प्रश्न निर्माण झाला आहे.

Leave a Comment