या राज्यातील रुग्णालयातील स्ट्रेचर आणि व्हीलचेअरचे भगवेकरण


आजमगढ – नुकतेच विश्वचषकात खेळणाऱ्या टीम इंडियाच्या भगव्या जर्सीचे अनावरण करण्यात आल्यानंतर देशातील एका राज्यातील रुग्णालयातील स्ट्रेचर, व्हिलचेअरसोबतच टेबल्सवरील चादरींचे भगवेकरण करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना उत्तरप्रदेशातील आजमगढ येथील जिल्हा रुग्णालयातील असून या रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारचे आरोग्यमंत्री सिद्धार्थ नाथ सिंह आले होते. रुग्णालय प्रशासनाने आरोग्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी यावेळी स्ट्रेचर, व्हीलचेअर आणि टेबल्सवरती चक्क भगव्या रंगाच्या चादरी अंथरल्या होत्या.

स्ट्रेचर, व्हीलचेअर आणि आपतकालीन टेबलला भगव्या रंगाच्या चादरीने रुग्णालय प्रशासनाने झाकले होते. यासंबंधी तेथील एका डॉक्टरांनी सांगताना म्हणाले, दररोज नवीन कलर रुग्णालयात वापरला जातो. रुग्णालयात भगवा रंग वापरण्यात आला होता. भगव्या रंगाची चादर राजकीय कारणासाठी अंथरली का? या प्रश्नावर उत्तर देताना डॉक्टर म्हणाले, हे सर्व राजकीय चर्चांना उधाण देण्यासाठी बोलले जात आहे.

आरोग्य मंत्री सिद्धार्त नाथ सिंह उत्तरप्रदेशातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी रुग्णालयाची तपासणी करत आहेत. त्यांनी यानिमित्ताने आजमगढ येथील जिल्हा रुग्णालयांची पाहणी केली. यासोबतच त्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांनी बैठक केली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील वैद्यकीय सोयी-सुविधांचा आढावा घेतला.

Leave a Comment