वेबसिरीजच्या स्वतंत्र सेन्सॉर बोर्डाची मला सदस्य करा – राखी सावंत


बॉलीवूडची ड्रामा क्वीन अर्थात राखी सावंत ही आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. त्यातच आता तिने सेन्सॉर बोर्डाची सदस्य होण्याचा निर्णय घेतला आहे. राखी नुकतीच आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी इंदुरमध्ये आली होती. त्या दरम्यान तिने आपल्या मनातील ही इच्छा बोलून दाखवली. या दरम्यान तिने वेब सिरीजसाठी स्वतंत्र सेन्सॉर बोर्ड असले पाहिजे असे म्हटले आहे.

राखी यावर म्हणते की, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरुन प्रदर्शित होणाऱ्या वेबसिरीजमध्ये मोठ्या प्रमाणात अश्लिलती पसरवली जाते. त्याला लगाम घालण्यासाठी स्वतंत्र सेन्सॉर बोर्ड स्थापण्याची गरज आहे. राखीला या बोर्डावर सदस्य व्हायचे असल्याची मागणी तिने पंतप्रधानांकडे केली आहे.

आरपीआईचे रामदास आठवले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांना राखीने विनंती केली आहे की, या सेन्सॉर बोर्डावर तिची नियुक्ती करावी. यातून अश्लिलता रोखणे सोपे होईल असेही तिने म्हटले आहे. लवकरच ‘धारा 370’ या चित्रपटात राखी सावंत झळकणार आहे.

Leave a Comment