‘कबीर सिंह’ने कमाईचे तोडले रेकॉर्ड, केली 150 कोटींची कमाई


‘कबीर सिंह’ चित्रपटातील अभिनेता शाहिद कपूरचा अभिनय प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरताना दिसत आहे. या चित्रपटात शाहिद कपूर एका प्रेमीची भूमिका साकारत आहेत. 21 जूनला प्रदर्शित झालेला हा चित्रपट आठवड्यानंतर देखील बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. या आठवड्यात अभिनेता आयुष्मान खुरानाची प्रमुख भूमिका असलेला ‘आर्टिकल 15’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मात्र तरी देखील ‘कबीर सिंह’ बघायला चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचे दिसत आहे.

आतापर्यंत चित्रपटाने 150 कोटींचा आकडा पार केला असून, लवकरच 200 कोटीच्या क्लबमध्ये समावेश होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी कबीर सिंहने 20.21 कोटींची कमाई केली होती. यंदाच्या शुक्रवारी 12.21 कोटींची चित्रपटाने कमाई केली असून, चित्रपटाची एकूण कमाई 146.63 कोटी झाली आहे.


कबीर सिंह हा तेलगू चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा रिमेक आहे. पद्मावतनंतर कबीर सिंह हा शाहिद कपूरचा सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे.

Leave a Comment