सोशल मीडियात #anna_yetoy या हॅशटॅगखाली मिम्सचा पाऊस


मुंबई : #anna_yetoy या हॅशटॅगखाली सध्या सोशल मीडियावर अनेक गंमतीदार मिम्स व्हायरल होत आहेत. पण याद्वारे हा कोणता नवीन अण्णा येणार आहे? या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. पण या मिम्समुळे लोकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

View this post on Instagram

सध्या सोशल मीडियात जोरदार चर्चा आहे ती अण्णाच्या परत येण्याची…#anna_yetoy या हॅशटॅग खाली हे अनेक मीम्स सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. अतिशय विनोदी आणि धमाल असे हे मीम्स आहेत. मात्र त्यातून हा अण्णा आहे तरी कोण या प्रश्नाचं उत्तर काही मिळत नाहीये. सध्या एखाद्या गोष्टीची उत्सुकता वाढवायची असेल तर मीम्स तयार करून पोस्ट केले जातात. पण अशी जाहिरातबाजी करण्याचा आणि अण्णा परत येण्याचा काय संबंध असाही एक प्रश्न आहेच. नक्की हा अण्णा आहे कोण ?

A post shared by Star Marathi (@starmarathi) on

View this post on Instagram

#ANNA_Yetoy 🤣🤣

A post shared by MMT (@marathimemesandtrolls) on


सध्या छोट्यापडद्यावरील रात्रीस खेळ चाले या मालिकेतील सर्वांच्या परिचयाचे अण्णा नाईक हे पात्र लोकांच्या पसंतीस उतरल्यानंतर आता कोणते नवे अण्णा पुन्हा आपल्याला पाहायला मिळणार आहेत, याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. एखाद्या नव्या गोष्टीची उत्सुकता वाढवायची असेल तर मिम्स तयार करुन शेअर केले जातात. पण अशी जाहिरातबाजी करण्याचा आणि अण्णा परत येण्याचा काय संबंध? असाही प्रश्न अनेकांना पडला आहे.

Leave a Comment