बॉलीवूडच्या या 7 अभिनेत्री आहेत सर्वात श्रीमंत


हिंदी सिनेसृष्टी हे एक असे मृगजल आहे जेथे जो येईल त्याची भरभराट कधी होईल याचा काही नेम नाही. त्यामुळेच हिंदी सिनेसृष्टीला सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून देखील ओळखले जाते. या क्षेत्रात काहींना यश मिळते तर काहींच्या पदरी अपयश येते. त्यातच आज आम्ही तुम्हाला काही यशस्वी आणि श्रीमंत अभिनेत्रींची माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या अभिनेत्री…

View this post on Instagram

❤️

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on


या यादीत सर्वप्रथम नाव येते ते बच्चन परिवाराची सून ऐश्वर्या राय बच्चनचे. ऐश्वर्या जरी सध्याच्या घडीला चित्रपटांमध्ये कमी दिसत असली तरी यामुळे तिच्या मालमत्तेवर कोणताही परिणाम झालेला नाही. जवळपास 35 दशलक्ष डॉलरहून जास्त संपत्ती ऐश्वर्याची स्वतःची आहे.

View this post on Instagram

#amishapatel

A post shared by priya (@priya_tai) on


कहो ना प्यार है या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अमिषा पटेल ही गदर एक प्रेम कथा या चित्रपटामधील आपल्या जबरदस्त अभिनयाने घराघरात पोहोचलेली. गेल्या अनेक वर्षांपासून अमिषा चित्रपटात दिसली नाही. पण तुम्हाला तिची मालमत्ता पाहून नक्कीच धक्का बसेल. जवळपास 30 दशलक्ष डॉलरहून जास्तीची अमिषाकडे संपत्ती आहे.


सुरुवातीच्या काळात दुरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या मेरी आवाज ही पहचान है या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुन अभिनेत्री अमृता राव चर्चेत आली होती. त्यानंतर तिने आर्य बब्बरसोबत अब के बरस या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये प्रवेश केला होता. बॉलीवूडमध्ये अमृताला जास्त वाव मिळाला नाही. त्यानंतर तिने आपला मोर्चा दाक्षिणात्य सिनेसृष्टीकडे वळवला. आजमितीस अमृताकडे जवळपास 20 दशलक्ष डॉलरहून जास्तची संपत्ती आहे.

View this post on Instagram

Loveeee @kajol 🖤

A post shared by Mazi ❤ (@kajolic.dil.se) on


1992 साली बेखुदी या चित्रपटाद्वारे अभिनेत्री तनुजा आणि निर्माते सोमू मुखर्जी यांची कन्या अभिनेत्री काजोलने बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. पण तिला खरी ओळख मिळाली ती शाहरुखसोबतच्या बाजीगर या चित्रपटामुळे. त्यानंतर तिने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट बॉलीवूड दिले. आजही काजोलचे दमदार अभिनय असलेले चित्रपट तिचे चाहते आवर्जुन पाहतात. काजोलची एकूण संपत्ती जवळपास 18 दशलक्ष डॉलर एवढी आहे.

View this post on Instagram

🌸

A post shared by Ileana D'Cruz (@ileana_official) on


2006 साली दाक्षिणात्य आणि 2012मध्ये बर्फी चित्रपटाद्वारे बॉलीवूड पदार्पण करणारी अभिनेत्री इलियाना डिक्रुजच्या नावावर अनेक चांगले चित्रपट आहेत. त्यात फटा पोस्टर निकला हिरो, मैं तेरा हिरो, हॅप्पी एंडिंग, रुस्तम, बादशाहो आणि रेड या चित्रपटांचा समावेश आहे. आतापर्यंत इलियानाची एकूण संपत्ती 15 दशलक्ष डॉलर एवढी आहे.


90च्या दशकातील सर्वात यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत अभिनेत्री करिश्मा कपूरचे नाव सर्वात आधी घेतले जाते. 1991साली प्रेम कैदी या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये प्रवेश करणाऱ्या करिश्माने बॉलीवूडच्या अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले आहे. सध्या ती आपल्या वैवाहिक जीवनामुळे चर्चेत आहेच त्याचबरोबर तिच्या संपत्तीच्या बाबतीत ती चर्चेत आहे. करिश्माकडे स्वतःची अशी १२ दशलक्ष डॉलरच्या आसपास एकूण संपत्ती आहे.


2000 साली विश्व सुंदरीचा खिताब जिंकणारी बॉलीवूडची देसी गर्ल अर्थात प्रियंका चोप्राचा देखील या यादीत समावेश आहे. 2003 साली हिरो – द लव्ह स्टोरी ऑफ स्पाय या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिले नाही. त्यातच तिला केंद्र सरकारने 2016 साली पद्मश्री पुरस्कारने सन्मानित केले. प्रियंकाकडे एकूण संपत्ती २८ दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त आहे.

Leave a Comment