आपली 3जी सेवा एअरटेलने केली बंद


कोलकाता- आपली 3जी सेवा बंद करण्याचा निर्णय भारतीय टेलीकॉम कंपनी भारतीय एअरटेलने घेतला आहे. कंपनीने याबाबतची घोषणा कोलकातामध्ये केली. आता आपले संपूर्ण लक्ष 4G नेटवर्कवर देण्याचे कंपनीने ठरवले असल्यामुळे एअरटेल हळूहळू आता इतर ठिकाणीही आपली 3G सर्व्हिस बंद करेल.

कोलकातामध्ये एअरटेल आपली 3जी सेवा बंद करत आहे. पण 2जी सेवा कंपनी सुरुच ठेवणार आहे. सध्या काही यूजर्सकडे 4G वापरण्याचा पर्याय नाही. यासाठी कंपनी अशा ग्राहकांसाठी 2जी सुरू ठेवणार आहे. सर्व 3जी ग्राहकांना आपला मोबाईल आणि सिमला अपग्रेड करण्यासाठी कंपनीने नोटिफिकेशन दिले आहे.

3जी मोबाईल कोलकातामधील ज्या ग्राहकांकडे आहे, अशा ग्राहकांना याचा त्रास होऊ शकतो. अशामध्ये लोक आता 3जी स्मार्टफोनचा वापर करु शकत नाही आणि त्यांना 2जीचा वापर करावा लागणार. 4G स्मार्टफोनची किंमत आता सर्व सामान्यांनाही परवडणारी असल्यामुळे ग्राहकांना जर एअरटेलचे सिम वापरायचे असेल, तर त्यांना आता 4जी मोबाईल घेण्याशिवाय पर्याय नाही.

Leave a Comment