वर्ल्ड कप सामन्यात मधमाश्यांनी खेळाडूंना मैदानात लोळविले


इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या आयसीसी वर्ल्ड कप मध्ये पावसाने अनेक सामन्यांवर पाणी फेरले असतानाच द.आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात शुक्रवारी झालेल्या सामन्यात मधमाश्यांच्या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे खेळाडूंना मैदानात चक्क लोळण घ्यावी लागली. या संदर्भातला व्हिडीओ क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ च्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे.


या सामन्यात अखेरी सेमी फायनल मधून अगोदरच बाहेर झालेल्या द. आफ्रिकेने ९ विकेटने विजय मिळवून श्रीलंकेच्या मार्ग अधिक खडतर बनविला. झाले असे कि द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. ४८ व्या ओव्हरमध्ये क्रिस मॉरिस बोलिंग करत असताना अचानक मधमाश्यांचा थवा मैदानात आल्याने खेळाडूंनी चक्क मैदानावर लोळण घेतली. दोन्ही अम्पायर सुद्धा मैदानात लोळले. क्रिसने त्यातही पुशअप काढून प्रेक्षकांची करमणूक केली. हा सामना रटाळ चालला होता त्यामुळे प्रेक्षक कंटाळले होते पण तेवढ्यात मधमाशा आल्याने खेळाडूंची तारांबळ उडाल्याने प्रेक्षकांच्या कंटाळा कुठल्याकुठे पळाला.


हा सारा प्रकार दोन मिनिटेच चालला. त्यानंतर पुन्हा सामना सुरु झाला. श्रीलंकेने सर्वबाद २०३ धावा करून विजयासाठी द.आफ्रिकेपुढे २०४ धावांचे आव्हान ठेवले.पण केवळ १ विकेट गमावून त्यांनी ते पार केले आणि सामना जिंकला.

Leave a Comment