लकी क्लास ऑफ ८४ च्या हातात देशाच्या संरक्षणाची धुरा


मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात एक अजब योगायोग पाहायला मिळत आहे. देशाच्या महत्वाच्या संरक्षण संबंधी विभागाच्या प्रमुखपदावर १९८४ च्या आयपीएस बॅच मधील अधिकाऱ्यांची एकामागून एक निवड झाली असून यामुळे केंद्रात सध्या लकी क्लास ऑफ ८४ चा वरचष्मा झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.


देशाच्या इंटेलिजन्स ब्युरो आणि रिसर्च अॅनेलीसीस विंग म्हणजे रॉच्या प्रमुखपदी अनुक्रमे अरविंद कुमार आणि सामंत गोयल यांची नेमणूक झाली असून ते दोघेही १९८४ आयपीएस बॅच मधले कोर्समेट आहेत. इतकेच नाही तर एनआयए, बीएसएफ पासून सिविल अॅव्हीएशन सुरक्षा विभागापर्यंत १९८४ च्या बॅचचेच आयपीएस अधिकारी नेमले गेले आहेत.


याची सुरवात झाली २०१७ मध्ये आसाम मेघालय केडरचे वाय. सी. मोदी यांना सप्टेंबर मध्ये एनआयएचे महानिदेशक म्हणून नियुक्त केले गेले तेव्हा. त्यानंतर अन्य अधिकारी विविध सुरक्षा विभागात प्रमुख म्हणून नेमले गेले आणि त्यातील बहुतेक सगळे ८४ च्या बॅचचे आहेत. हा एक अजब योगायोग आहे. २०१८ जानेवारी मध्ये तेलंगाना केडरचे सुदीप लखटाकिया एनएसजी प्रमुख म्हणून नियुक्त झाले आहेत. त्यानंतर तीन महिन्यात बिहार केडरचे राजेश रंजन सीआयएसएफ प्रमुख म्हणून नियुक्त केले गेले.

१९८४ युपी केडरचे रजनीकांत मिश्रा बीएसएफ प्रमुख आहेत तर हरियाना केडरचे एस. एस. देशवाल इंडोतिबेट बोर्डर पोलीसचे प्रमुख बनले आहेत. गुजराथ केडरचे राजेश अस्थाना हवाई सुरक्षा प्रमुख आहेत तर बुधवारी सामंत गोयल आणि अरविंद कुमार याची रॉ आणि आयबी प्रमुख म्हणून नेमणूक केली गेली आहे.

Leave a Comment