युरोप मध्ये काहिली, फ्रांसचा पारा ४५ अंशावर


संपूर्ण युरोप सध्या उन्ह्याच्या तडाख्यात पोळून निघाले असून जूनच्या शेवटच्या आठवड्यांत युरोप मधील बहुतेक सर्व देशात तापमानाने नवे रेकोर्ड नोंदविले आहे. फ्रांसमध्ये पाऱ्याने ४५ अंशांची पातळी गाठली आहे आणि अनेक देशात उष्णतेची लाट आली आहे.

युरोप मधील बहुतेक भाग हा २५ ते ४५ अक्षांश परिसरात आहे. हा कमी तापमान झोन मानला जातो. त्यामुळे येथे ४० डिग्री पर्यंत तापमान गेले कि उष्णतेची लाट मानली जाते. फ्रांसच्या कार्पेन्त्रास येथे ४५.१ डिग्री तापमान नोंदविले गेले आहे आणि तापमानाचा पारा अजून वर जाण्याची शक्यता हवामान तज्ञ व्यक्त करत आहेत. आफ्रीकेतून येत असलेल्या उष्ण वाऱ्यांचा हा परिणाम असल्याचे समजते. फ्रांस मध्ये शाळांना सुट्टी दिली गेली आहे. राष्ट्रपती इमॅन्यूअल मॅक्रो यांनी उष्णतेपासून संरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण सरकार कामाला लागल्याचे सांगितले असून रस्त्यात कारंजी सुरु ठेवण्यात आली आहेत.


न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार फ्रांसच्या दुकानातून सर्व पंखे आणि एसी विकले गेले आहेत. पॅरीसमध्ये सध्या महिला फुटबॉल वर्ल्ड कप सुरु आहे आणि तेथे ३२ अंशांच्या वर तपमान गेले तर वॉटर ब्रेक देण्याचा निर्णय घेतला गेला आहे.


स्पेन मध्ये तापमान ४० डिग्रीवर आहे आणि तेथेही गारवा मिळावा म्हणून रस्त्यावर कारंजी सुरु केली गेली आहेत. स्विमिंग पूल ओपन केले गेले असून नागरिकांना मोफत स्विमिंगची सुविधा दिली जात आहे. झु मधील प्राण्यांना फ्रुट आईसक्रिम खिलविले जात आहे. जर्मनी मध्ये तापमानाने ७० वर्षाचे रेकॉर्ड तोडले आहे. रस्त्यावर पुरुष वर्ग शर्टशिवाय फिरत आहेत. हंगेरी बुडापेस्टमध्ये तापमान ३६ डिग्रीवर आहे आणि ते रेकॉर्डब्रेक तापमान आहे. स्वित्झर्लंड मध्ये चौथ्या पातळीवरची हीट वॉर्निंग दिली गेली आहे.

Leave a Comment