मेस्सीचा हूबहु रझा वर २३ महिलांशी संबंध ठेवल्याचा आरोप


फुटबॉल आणि लीयोनेल मेस्सी यांचे अतूट नाते जगाला माहिती आहे. फुटबॉल म्हटले कि मेस्सी आणि मेस्सी म्हटले कि फुटबॉल हे जणू समीकरण बनले आहे. अर्जेन्टिनाचा हा स्टार खेळाडू त्याच्या खेळासाठी जगात प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे त्याच्या चाहत्या वर्गात तरुण मुलींची संख्या साहजिकच भरपूर आहे. अनेक तरुण मुली त्याच्या प्रेमात पडल्या आहेत मात्र त्याच्यावर अजून तरी कुणाही मुलीला फसविल्याचे आरोप लागलेले नाहीत.

इराणचा मेस्सी म्हणून रातोरात प्रसिद्धीस आलेल्या मेस्सीचा हूबहु म्हणजे हमशकल रेझा पारास्टोश याच्यावर मात्र २३ महिलांशी संबंध ठेऊन त्यांची फसवणूक केल्याचा आरोप होत आहे. रेझा मॉडेल म्हणून काम करतो. तो इराणचा राहणारा असून हुबेहूब मेस्सी सारखा दिसतो. त्याने मात्र हे सारे आरोप फेटाळून लावले आहेत. तो म्हणतो मी निर्दोष आहे. ही धोकादायक बातमी निखालस खोटी असून मुस्लीम देशात जाणूनबुजून सोशल मिडीयावर पसरविली जात आहे. याचा त्रास मला आणि माझ्या कुटुंबाला होतो आहे. लोक मला आरोपी मानून काहीही बोलत आहेत.


२६ वर्षाचा रेझा चर्चेत आला तो तेहरान मध्ये त्याच्या वडिलांनी त्याला बार्सिलोनाची जर्सी घालून फोटो काढायला लावला तेव्हा. त्याच फोटोमुळे तो रातोरात स्टार बनला. मेस्सी बरोबर त्याचे कमालीचे साम्य त्याला इराणचा मेस्सी अशी ओळख मिळवून देण्यास कारणीभूत ठरले. जगभर तो याच नावाने फेमस झाला आहे.

मिरर ने दिलेल्या बातमीनुसार त्याच्यावर करण्यात आलेल्या आरोपसंदर्भात त्याने एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून त्यात तो म्हणतो, मी निर्दोष आहे. मी असे काही केले असते तर या २३ मुलींपैकी एकीने तरी माझ्या विरोधात तक्रार नोंदविली असती आणि मी तुरुंगात गेलो असतो.

Leave a Comment