‘मेंटल है क्या’ नव्या नावासोबत रिलीज होणार ?


गेल्या बऱ्याच दिवसापासून बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि अभिनेता राजकुमार राव यांचा ‘मेंटल है क्या’ या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. अनेक वादविवादात हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच अडकला आहे. कंगनाने अलिकडेच सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनला (CBFC) भेट दिली. या त्यांच्या मिटिंगमध्ये या चित्रपटाच्या नावामध्ये आणि काही सिनमध्ये बदल करण्याचे सुचविण्यात आले आहेत. पण अद्याप या चित्रपटाच्या नावात बदल झाला नाही. तरीही या चित्रपटाला लवकरच नवे नाव देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

याबाबत एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, बालाजी मोशन पिक्चर्स अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती होत आहे. या चित्रपटाच्या नावाबाबत लवकरच निर्माते आपला निर्णय जाहीर करतील, असेही सांगण्यात येत आहे. हा चित्रपट या शिर्षकामुळे वादात अडकला आहे. याबाबत इंडियन सायक्रॅटिक सोसायटी तर्फे प्रसून जोशी यांना पत्र देखील पाठविण्यात आले होते. त्यात या शिर्षकावर आक्षेप घेण्यात आला होता.

काही मोशन पोस्टर्स कंगना आणि राजकुमारचे प्रदर्शित करण्यात आले आहेत. कंगना आणि राजकुमारचा चित्रविचित्र या पोस्टर्समध्ये लूक पाहायला मिळतो. या चित्रपटातील काही महत्वपूर्ण भाग देखील काढण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला आता फार कमी वेळ उरलेला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आत्तापर्यंत लाँच झाला नाही. मात्र, काही पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहेत. आता चाहत्यांना या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतिक्षा आहे. हा चित्रपट २६ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Leave a Comment