छगन भुजबळांकडून मराठा आरक्षणाचे स्वागत


मुंबई – मराठा समाजाला दिलेले आरक्षण उच्च न्यायालयाने ग्राह्य मानले असून इतर मागासवर्गीयांच्या हक्कावर कोणतीही गदा या आरक्षणामुळे येणार नाही, मराठा समाजाला आघाडी सरकारनेही आरक्षण दिले होते. आता यावर कायदेशीर शिक्कामोर्तब झाल्याने आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणावर अनेकदा मराठा समाजाच्या आरक्षणामुळे परिणाम होईल, अशा शंका-कुशंका काढल्या जात होत्या.

पण उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे इतर मागासवर्गीयांवर अन्याय होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मराठा समाजाचेही मागासलेपण न्यायालयाने मान्य केले असून सरकाराला अपवादात्मक स्थितीत ५० टक्यांच्यावर आरक्षण देण्याचा अधिकार असल्याचा निर्वाळाही न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आता कायदेशीर कसोटीवर हे आरक्षण सिद्ध झाले असल्याने त्याचे स्वागत करत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. त्यामुळे आता कायदेशीर कसोटीवर हे आरक्षण सिद्ध झाले असल्याने त्याचे स्वागत करत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

Leave a Comment