अनुष्काच्या या फोटोवर विराटही भाळला


भारतीय संघ आयसीसी विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीच्या जवळ पोहोचला असून कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात दमदार अर्धशतक झळकावले होते. विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माही या दौऱ्यात लंडनमध्ये त्याच्यासोबत आहे.


दरम्यान आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अनुष्काने एक फोटो शेअर केला. तिने या फोटोसोबत प्रसिद्ध ब्रिटीश फॅशन आयकॉन ऑड्रे हेपबर्न यांचे एक वाक्यही शेअर केले आहे. तिने म्हटले आहे, ‘आनंदी मुली सर्वात सुंदर असतात.

विराटही अनुष्काने शेअर केलेल्या या फोटोवर भाळला आहे. अनुष्काच्या या फोटोवर कमेंट करत त्याने तिच्या हास्याचे कौतुक केले आहे. तू नेहमीच सुंदर दिसते, अशी प्रतिक्रिया विराटने दिली आहे. सध्या सोशल मीडियावर अनुष्काचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला असून तिच्या चाहत्यांची या फोटोला मोठ्या प्रमाणात पसंती मिळताना दिसत आहे.

Leave a Comment