देशातील पहिले फुड एटीएम औरंगाबादेत झाले सुरु


औरंगाबाद – सध्याच्या घडीला आपल्या जेव्हा जेव्हा पैसे लागतात तेव्हा तेव्हा आता आपण बँकेशिवाय सरळ एटीएम गाठतो आणि त्यातच जर त्या एटीएममध्ये पैसे नसतील तर आपली होणारी चीडचिड पाहण्याजोगी असते. देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यात एटीएम पोहचले असून त्याच धर्तीवर आता देशातील पहिले फूड एटीएम महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे सुरु झाले आहे. या एटीएमची खासियत म्हणजे पैसे टाकून तब्बल 48 पदार्थ तुम्ही मिळवू शकता. ही योजना वाळूज एमआयडीसीतील तरूण उद्योजक प्रतिक पाटील यांनी साकारली आहे.

हे एटीएम एमआयडीसीमधील प्रतिक यांच्या लेसोकार्ट इंडस्ट्रीज प्रा. लिमीटेड कंपनी मध्ये बसवण्यात आले आहे. ते स्वतः या प्रयोगाद्वारे रिटेल फूड व्यवसायात उतरत आहेत. याच्या पुढची पायरी म्हणून, औरंगाबादच्या बसस्टँड, रेल्वेस्टेशनवर 3 महिन्यात मणुष्यविरहित ‘लेसोकार्ट फूड पाईंट’ सुरू होणार आहेत. फूड एटीएमचा व्यवसाय करणाऱ्या सेगा आणि इन्स्टा गो अशा परदेशी कंपन्या सध्या आहेत. या कंपन्यांची मशीन भारतात काही ठिकाणी वापरली जाते. मात्र लेसोकार्टमधील फूड व्हेडिंग मशीन देशातील पहिली भारतीय बनावटीची मशीन ठरली आहे.

फक्त दीड लाख रुपये एवढी या मशीनची किंमत आहे. या मशीनद्वारे अवघ्या 5 बाय 5 फुट जागेत तुम्ही तुमचा व्यवसाय करू करू शकता. या मशीन मध्ये 48 प्रकारे प्रॉडक्ट ठवता येतात, यामध्ये बिस्कीट, चॉकलेट्स, केक, व्हेफर्स आदींचाही समावेश आहे. आदीचा समावेश आहे. नोटा, कार्ड, पेटीएम किंवा अन्य मोबाईल व्हॅलेटद्वारे तुम्ही हे पदार्थ विकत घेऊ शकता. दरम्यान, गेली दोन वर्षे प्रतिक पाटील या मशीनसाठी काम करत होते. तीन देशांमधून या मशीनचे पार्टस मागवण्यात आले आहेत. त्यांचे एकत्रीकरण भारतात घडले.

Leave a Comment