एसएनबी रिपोर्टमधून स्विस बँकेत भारतीयांचे 99 लाख कोटी रूपये असल्याचा खुलासा


नवी दिल्ली : सध्या देशात स्विस बँकेतील काळ्या पैशावरून मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. भाजपने 2014मध्ये सत्तेवर येण्यापूर्वी देखील काळ्या पैशाचा मुद्दा उचलला होता. दरम्यान, भारतीयांची नावे जाहीर करण्याची आणि स्विस बँकेतील पैशाची आकडेवारी जाहीर करण्याची तयारी स्विस बँकेने देखील दर्शवली. भारतीयांच्या स्विस बँकेत असलेल्या पैशाची आकडेवारी त्यानंतर समोर आली आहे.

एसएनबी रिपोर्टनुसार भारतीयांचे स्विस बँकेत 99 लाख कोटी रूपये जमा आहेत. स्विस बँकेत 2018मध्ये भारतीयांचे 6757 कोटी रूपये जमा जाले होते. पण, 2017ची तुलना करता ही रक्कम 6 टक्क्यांनी कमी आहे. 2016मध्ये मात्र स्विस बँकेत 675 मिलियन स्विस फ्रैंक जमा होते. स्विस बँकेत जमा करण्यात आलेले पैसे हे व्यक्ती, कंपनी यांच्या मार्फत असल्याचे देखील एसएनबी रिपोर्टने म्हटले आहे. विशेष म्हणजे एसएनबी रिपोर्टमध्ये कोणतीही माहिती स्तोमक विस बँकेतील काळ्या पैशाबाबत देण्यात आलेली नाही. स्विस बँकेत पैसे जमा करण्यामध्ये 2017मध्ये भारत 73व्या स्थानी होता. तर, 2016मध्ये भारत 88व्या स्थानावर होता.

50 भारतीयांना स्वित्झर्लंडने नोटीस पाठवली आहे. भारत सरकारला माहिती देण्यापूर्वी अपिलाची एक संधी यामध्ये देण्यात आली आहे. 11 भारतीयांना 21 मे रोजी नोटीस देण्यात आली आहे. यामध्ये 1949मध्ये जन्म झालेल्या कृष्ण भगवान रामचंद आणि 1972मध्ये जन्म झालेल्या कल्पेश हर्षद किनारीवाला यांचा समावेश आहे.

त्याचबरोबर स्वीस बँकेतील खात्यासंदर्भात काही नावांचे सुरूवातीची अक्षरे समोर आली आहेत. यामध्ये 24 नोव्हेंबर 1944 रोजी जन्म झालेले एसएसबीके, 9 जुलै 1944 रोजी जन्म झालेले बीकेआय, 2 नोव्हेंबर 1983 रोजी जन्म झालेल्या पीएएस, 22 नोव्हेंबर 1973 रोजी जन्म झालेल्या आरएएस, 27 नोव्हेंबर 1944 रोजी जन्म झालेल्या एपीएस, 14 ऑगस्ट 1949 रोजी जन्म झालेले एडीएस, 20 मे 1935 रोजी जन्म झालेले एमएलए, 21 फेब्रुवारी 1968 रोजी जन्म झालेले एनएमए आणि 27 जून रोजी जन्म झालेले एमएमए यांच्या नावांचा समावेश आहे. या सर्वांना अपिलासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

Leave a Comment