मुंबई – अनेक बँकापुढे अनेक अडचणी सरकारी बँकाकडील अनुत्पादक मालमत्ता ( एनपीए) वाढत असल्याने निर्माण झाल्या आहेत. अशातच १० बड्या कर्जबुडव्यांची यादी स्टेट बँक ऑफ इंडियाने जाहीर केली आहे. मोठ्या कंपन्या आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचा यादीमध्ये समावेश आहे. एसबीआयचे १ हजार ५०० कोटी रुपये या कर्जबुडव्यांकडे थकले आहेत. औषधी कंपन्या, जेम्स आणि ज्वेलरी, उर्जा, पायाभूत क्षेत्र आणि इतर क्षेत्रांतील कंपनी व अधिकाऱ्यांचा कर्जबुडव्यामध्ये समावेश आहे.
१० बड्या कर्जबुडव्यांनी थकवले एसबीआयचे १५०० कोटी रुपये
मुंबईतील एसबीआयच्या कॅफे परेडवरील स्ट्रेस्ड असेट्स मॅनेजमेंट शाखेने याबाबतची जाहीर नोटीस काढली आहे. कर्जबुडव्यामधील बहुतांश लोक हे मुंबईमधील रहिवासी आहेत. कर्ज फेडण्याबाबत त्यांना स्टेट बँक ऑफ इंडियाने सातत्याने नोटीस पाठविल्या आहेत.
मुद्दल आणि त्यावरील व्याज जर १५ दिवसात फेडले नाही तर कायदेशीर कारवाई करू, असा एसबीआयने कर्जबुडव्यांना इशारा दिला आहे. किंगफिशरचा मालक विजय माल्ल्या हा स्टेट बँक ऑफ इंडियाचे कोट्यवधी रुपये बुडवून इंग्लंडमध्ये पळून गेला आहे. तर पंजाब नॅशनल बँकेची १२ हजार कोटींहून अधिक फसवणूक करून नीरव मोदी हा हिरे व्यापारी व त्याचा मामा मेहूल चोक्सी इंग्लंडमध्ये पळून गेले आहेत. बँकांने हे पैसे बुडवून विदेशात पळून गेले असताना त्यांच्या प्रत्यार्पणासाठी केंद्र सरकारला सध्या मोठी कसरत करावी लागत आहे.