एवढ्या संपत्तीचा मालक आहे खिलाडी कुमार


आपल्या दैनंदिन सवयींसोबतच बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार किती शिस्तप्रिय आहे हे आपल्यापैकी बहुतेकांना माहित आहे. आपल्या फिटनेसबाबतीतही हा अभिनेता फार जागरुक असतो. अक्षय कुमारचे नाव बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये आवर्जुन घेतले जाते. अक्षयने आपल्या २९ वर्षांच्या करिअरमध्ये आतापर्यंत १०० हून अधिक चित्रपटात काम केले आहे. अक्षयने गेल्या काही वर्षांमध्ये रुस्तम, बेबी, केसरी, यांसारखे नाविन्यपूर्ण चित्रपट केले आहेत की त्याचा स्वतःचा असा एक चाहता वर्ग तयार झाला आहे.

राजीव ओम भाटिया असे अक्षयचे खरे नाव आहे हे तर साऱ्यांनाच माहीत आहे. त्याने सिनेसृष्टीत येण्यापूर्वी आपले नाव अक्षय कुमार असे केले. अमृतसरमध्ये अक्षयचा जन्म झाला असला तरी लहानाचा मोठा तो चांदनी चौकमध्ये झाला. आपले नशीब आजमावल्यानंतर मुंबई, कलकत्ता, थायलंड येथे अक्षयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याने २००१ मध्ये अभिनेत्री ट्विंकल खन्नाशी लग्न केले. दोघांना दोन मुले आहेत. आम्ही आज तुम्हाला अक्षय कुमारकडे असलेल्या सर्वात महागड्या गोष्टी, संपत्तीबद्दल सांगणार आहोत.

मीडिया रिपोर्टनुसार, प्रत्येक चित्रपटासाठी अक्षय कुमार साधारणपणे ३० कोटी रुपये मानधन घेतो. तर काहीवेळा अक्षयने प्रत्येक दिवसासाठी १ कोटी रुपये मानधन घेतल्याच्याही चर्चा झाल्या होत्या. फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, २० ब्रँड अक्षयने साइन केले. तर लाइव्ह मिन्टने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, प्रत्येक जाहिरातीच्या दर दिवसाच्या चित्रीकरणासाठी १ ते १.५ कोटी रुपये घेतो. तर रसना या ब्रँडने १८ कोटी रुपयांत तीन वर्षांचा करार अक्षयसोबत केला आहे.

हरी ओम एण्टरटेनमेन्ट आणि ग्रेझिंग गोट पिक्चर्स या दोन प्रोडक्शन हाउस अक्षय कुमारने सुरू केल्या. त्याने या प्रोडक्शन अंतर्गत ‘रुस्तम’, ‘पॅडमॅन’ आणि ‘ओह माय गॉड’ या चित्रपटांची निर्मिती केली. याशिवाय जुहूमध्ये अक्षय आणि ट्विंकलचे समुद्र किनारी एक घर आहे. तसेच मॉरिशसमध्ये समुद्र किनारी मालमत्ता, टोरंटोमध्ये एक बंगला, कॅनडामध्ये एक टेकडी आणि अंधेरीमध्ये चार घरे आहे. विशेष म्हणजे या चार घरांची प्रत्येकी किंमत साधारणपणे ४.५ कोटी ते ५ कोटी रुपये एवढी आहे.

अक्षयकडे रॉयस फॅंटॉम (सुमारे ८.९ कोटी), बेंटले कॉन्टिनेंटल फ्लाइंग स्पूर (सुमारे ३.२१ कोटी), पोर्श केयने (सुमारे १. ४ कोटी) आणि रेंज रोवर वोग (सुमारे २.७५ कोटी) या हाय क्लास गाड्या आहेत. फार कमी लोकांना माहीत आहे की, अक्षयकडे हार्ले डेव्हिडसन व्ही-रॉड, प्रायव्हेट जेट आहे. याशिवाय तो वर्ल्ड कबड्डी लिगचा मालक आहे. वर्षाला १५० दशलक्ष डॉलर अक्षय कुमार कमावतो.

Leave a Comment