ब्रेकिंग डान्सचा ऑलिम्पिक गेम्स मध्ये समावेश


इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने नुकतीच ब्रेकिंग डान्स किंवा ब्रेक डान्स, स्केट बोर्डिंग, स्पोर्ट क्लीम्बिंग आणि सर्फिंग ला ऑलिम्पिक गेम्स मध्ये सामील करण्याची अनुमती दिली असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. हे खेळ सध्या हंगामी स्वरुपात सामील केले जाणार आहेत. टोक्यो मध्ये होत असलेल्या २०२० च्या ऑलिम्पिक मध्ये स्केट बोर्ड, सर्फिंग आणि स्पोर्ट क्लीम्बिंग सामील केले जातील तर २०२४ मध्ये पॅरीस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धात ब्रेकिंग डान्स सामील केला जाणार आहे.

हे क्रीडाप्रकार ऑलिम्पिक मध्ये सामील करावे यासठी टोक्यो २०२० कार्यक्रम विकासावर आधारित प्रस्ताव सादर केला गेला होता. त्यात २४८ अॅथलिट सामील असून ते १०५०० अॅथलिट कोटा मध्ये समाविष्ट आहेत. यात महिला आणि पुरुष यांची संख्या समान असेल. खेळांच्या आयोजन संदर्भात दिलेली आश्वासने लक्षात घेऊन पॅरीस २०२४ ऑलिम्पिक मध्ये या सर्व क्रीडाप्रकारांचा समावेश केला जात असल्याचे पॅरीस ऑलिम्पिक आयोजक समितीचे अध्यक्ष टोनी एस्टुंगेट यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने आमचा प्रस्ताव मान्य केला याचा आनंद वाटतो असेही ते म्हणाले.


ब्रेक डान्सिंग हा क्रीडा प्रकार म्हणजे स्ट्रीट डान्सिंगचा प्रकार असून त्याला ऑलिम्पिक सर्कल मध्ये ब्रेकिंग नावाने ओळखले जाते. रस्त्यारस्त्यातून केला जाणारा हा प्रकार ऑक्टोबर २०१८ मध्ये बृनोस आयरिस येथे पार पडलेल्या युथ समर गेम्समध्ये सामील होता आणि तेथे या खेळासाठी पहिले मेडल दिले गेले. स्ट्रीट डान्स स्पर्धा बरेच ठिकाणी आयोजित होतात त्यात १६ अॅथलेट्स सामील असतात. महिला पुरुष अॅथलेट्स सम संख्येत असतात.

पॅरीस मध्ये ऑलिम्पिक आयोजन करण्यासाठी यापूर्वी फ्रांस सरकारने २००८ आणि २०१२ मध्ये दावा केला होता मात्र त्यावेळी त्यांची निवड होऊ शकली नव्हती. २०२४ मध्ये १०० वर्षानंतर पॅरीस मध्ये या स्पर्धा आयोजित होतील. पॅरीस ऑलिम्पिक आयोजक समितीचे अध्यक्ष टोनी एस्टुंगेट म्हणाले, हे गेम्स स्टेडियम प्रमाणेच स्टेडीयम बाहेर, शहराच्या मध्यवस्तीत, समुद्र किनारी व्हावेत अशी आमची कल्पना होती त्यातूनच ब्रेकिंग डान्स, सर्फिंग, स्केट बोर्डिंग सारखे क्रीडा प्रकार ऑलिम्पिक मध्ये यावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो.

Leave a Comment